पुणे भाजपाच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती | पुढारी

पुणे भाजपाच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील विविध जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केल्या असून यामध्ये पुणे शहर भाजप अध्यक्षपदी माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपची पिचेहाट झाली. त्यामध्ये हक्काच्या व पारंपरीक मतदार असलेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद वापरूनही भाजप शिसेना युतीचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाकरी फिरवण्याचे संदेश दिले होते. यासोबतच भाजप विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता नविन चेहऱ्याला संधी मिळणार हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मुळीक यांच्या जागी नवीन शहराध्यक्ष म्हणून माझी महापौर व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे यांची नावे चर्चेत होती. अखेर बावनकुळे यांनी शहराध्यक्षपदाची माळ धीरज घाटे यांच्या गळ्यात टाकत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याचवेळी बावनकुळे यांनी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि ग्रामीण अध्यक्ष म्हणून मावळ विभागासाठी जिल्हा परिषदेतील माजी गटनेते शरद बुट्टे पाटील, बारामती विभागासाठी वासुदेव काळे यांची नियुक्ती केली आहे.

हे ही वाचा : 

NCP Praful Patel : राष्ट्रवादी एनडीएचा अविभाज्य घटक, भविष्यात एकत्र काम करू : प्रफुल्ल पटेल

सुफा आतंकवादी संघटनेतील दोघांना पुण्यात अटक ; प्रत्येकावर होते पाच लाखांचे बक्षीस

Back to top button