दूध खरेदी दर घसरणीने सहकारी संघाची फरपट

दूध खरेदी दर घसरणीने सहकारी संघाची फरपट
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

खासगी डेअर्‍यांकडून गायीच्या दूध खरेदी दरात कपात करून तो प्रतिलिटरला 33 रुपये केला असून सहकारी दूध संघाकडून अद्यापही लिटरला 35 रुपये दर देण्यात येत असल्यामुळे खासगींकडील दूध सहकारी संघाकडे वळले आहे त्यमूळे संकलनात वाढ होण्यामुळे स्पर्धेत ते अडचणीत आले आहेत.

दूध पावडर आणि बटरचे दर वाढले की, खरेदीसाठी चढे दर ठेवून दुधाची पळवापळवी करण्यात खासगी दूध डेअर्‍यांचा हातखंडा झालेला आहे. यातील वाढीव दरामुळे शेतकर्‍यांचा फायदा होत असल्याने ही बाब चांगली असली तरी अचानकपणे आणि मनमानी पद्धतीने दर कमी करण्यातही खासगी डेअर्‍याच पुढे आहेत. त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना दुधाच्या दराची शाश्वती आणि विश्वास देण्याबाबत कोणीच बोलायला तयार नाही.

दरम्यान, खासगी डेअर्‍यांकडून दूध खरेदी दर कमी करण्याचा प्रमुख अजेंडा समोर ठेवण्यात आला असून यावर शुक्रवारी (दि.20) पुन्हा एकदा पुढील निर्णयासाठी बैठक होत असून आणखी दर कमी करण्यावर निर्णय होणार असल्याचे समजते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news