Flower Market Crash: फुलांचे बाजारभाव कोसळले; किलोला अवघा 30 रुपये

शेवंती फुलांना पडला तोटा; रोगकिडीचा प्रादुर्भाव वाढला, उत्पादन खर्चही परवडेनासा
Flower Market Crash
Flower Market CrashPudhari
Published on
Updated on

नारायणगाव : शेवंती फुलांचे बाजारभाव कोसळल्यामुळे फुलशेती करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. किलोला अवघे 30 रुपये दर मिळत असल्याने फुले तोडणीसाठी घेतलेल्या मजुरांचेही पैसे भागवणे कठीण झाले असून शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

Flower Market Crash
Liquor Raid Shirur: शिक्रापूरमधील 9 दारूअड्ड्यांवर पोलिसांचा धडाका; बेकायदेशीर दारूविक्री प्रकरणी गुन्हे दाखल

शेवंती हे नेहमीच हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जात असले, तरी यंदा बाजारभाव खालावल्याने शेवंती उत्पादकांचे गणित बिघडले आहे. पांढरी, गुलाबी आणि पिवळी अशा विविध रंगांच्या शेवंतीची मागणी असताना देखील बाजारात भाव मिळत नसल्याची स्थिती आहे.

Flower Market Crash
Nilu Phule Pune History Politics: निळू फुले यांनी उभारला माझ्यासाठी निवडणूक निधी

यातच काळा मावा, पांढरा मावा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढल्याने औषध फवारणीचा खर्चही वाढला आहे. भाव नसल्यामुळे औषध खर्च करणेही शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे.

Flower Market Crash
Karvenagar PMC Election Politics: कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनीत तिरंगी लढत संभव भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीत तीव्र रस्सीखेच

‌‘किमान 80 ते 100 रुपये किलोला भाव मिळाला तरच फुलशेती परवडते,‌’ असे मत येडगाव (ता. जुन्नर) येथील फूल उत्पादक रामदास भिसे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,‌ ‘गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रोगकिडीचे प्रमाण वाढले आहे. बाजारभाव घसरले आणि खर्च वाढला, त्यामुळे हे अर्थकारण कसे जुळवायचे, ही मोठीच पंचाईत झाली आहे.‌’

Flower Market Crash
Karvenagar DP Road Issues: कर्वेनगर डीपी रस्ता भूसंपादनाअभावी रखडला

सध्या मिळणाऱ्या 30 रुपयांच्या दराने तर भांडवलही

फिटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना दिसून येत आहे. परिणामी फुलशेती अडचणीत येऊन ठेपली आहे. किलोला अवघा 30 रुपयांचा दर; उत्पादक शेतकरी नाराज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news