Liquor Raid Shirur: शिक्रापूरमधील 9 दारूअड्ड्यांवर पोलिसांचा धडाका; बेकायदेशीर दारूविक्री प्रकरणी गुन्हे दाखल
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरातील 9 दारूअड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून दारू विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
अन्वर दौलत शेख (वय 35, रा. करंदी, ता. शिरूर. मूळ रा. शिवाजीनगर, कराड, जि. सातारा), भाईदास बटर भोसले (वय 32, रा. कोंढापुरी, ता. शिरूर), प्रतीक विक्रम भोगावडे (वय 29, रा. धानोरे, ता. शिरूर), सागर मधुकर निंभोरे (वय 30, रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर), करण सत्यनारायण चौहाण (वय 26) व गणेश सीताराम राणे (वय 38, दोघेही रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर), सुनीता शहाजी माने (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर), जीवन दशरथ दरेकर (वय 38, रा. दरेकरवाडी, ता. शिरूर), नंदिनी नंदकिशोर नानावत (वय 29, रा. वाडेगाव, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शिक्रापूर पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर पोलिस हवालदार किशोर तेलंग, महेंद्र पाटील, विकास सरोदे, दामोदर होळकर, गणेश कुदळे, मच्छिंद्र निचित, गणेश येळवंडे यांच्या पथकाने करंदीत मोहटादेवी हॉटेल, कोंढापुरी जिल्हा परिषद शाळेजवळ, धानोरेत स्वराज हॉटेल, कान्हूर मेसाईत माथेरान हॉटेल, कोरेगाव भीमात कांचनवस्ती व बाजार मैदान, सणसवाडीत जय मल्हार हॉटेल तसेच वाडेगाव परिसरात छापे टाकत दारू जप्त केली. तसेच दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले. शिक्रापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

