पिंपरी : चिखली पोलिसांची गुजरातमध्ये कारवाई

पिंपरी : चिखली पोलिसांची गुजरातमध्ये कारवाई
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  मागील काही महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला रावण टोळीतील गुंड तसेच मोकातील फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली. चिखली पोलिसांनी गुजरातमधील वडोदरा येथे ही कारवाई केली. कपिल उर्फ विजय दीपक लोखंडे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कपिल हा रावण टोळीचा सदस्य आहे. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी चिखली येथे सोन्या तापकीर या तरुणाला गोळ्या घालून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणातील प्रमुख आरोपीसह इतरांना पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. पोलिसांनी या टोळीला मोका लावला; मात्र लोखंडे हा पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. चिखली पोलिस त्याच्या मागावर होते.

दरम्यान, 28 जुलै रोजी कपिल लोखंडे याने इंस्ट्राग्रामवरून चिखली परिसरात राहणारी त्याच्या मैत्रिणीला संपर्क केला. पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणात ते दिसून आले. चिखली पोलिसांनी तात्काळ त्याच्या मैत्रिणीस ताब्यात घेऊन तिच्या माध्यमातून लोखंडे याच्याशी संपर्क सुरू ठेवला. पोलिस उपनिरीक्षक बारावकर यांच्या पथकाने वडोदरा, गुजरात येथे जाऊन तेथील स्थानिक मकरपुरा पोलिस स्टेशनची मदत घेत लोखंडे याला ताब्यात घेतले. सहायक आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, भानुदास बर्गे, सहायक निरीक्षक तोफिक सय्यद, उपनिरीक्षक पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news