Chakan Market Yard Rates: चाकण मार्केट यार्डात भाजीपाल्याची मोठी आवक; कांद्याचे भाव तेजीत

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत 6.90 कोटींची उलाढाल; बटाट्याचे दर घसरले, लसूण स्थिर
Onion Potato
Onion PotatoPudhari
Published on
Updated on

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, हिरवी मिरची, कांदा व टोमॅटोची भरपूर आवक झाली. लसणाचे भाव स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर व मेथीची आवक कमी होऊनही भाव गडगडले. एकूण उलाढाल 6 कोटी 90 लाख रुपये झाली.

Onion Potato
Gaurav Ghule Pune Municipal Election: जागतिक वेटलिफ्टर गौरव घुले यांनी रोखला भाजपचा विजयरथ

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण 6 हजार 500 क्विंटल आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक 500 क्विंटलने घटली. कांद्याचा कमाल भाव 1,700 रुपयांवरून 1,800 रुपयांवर पोहचला. बटाट्याची एकूण आवक 3,000 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक 500 क्विंटलने वाढल्याने भावात 100 रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल 1,300 रुपयांवरून 1,200 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 40 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 10 क्विंटलने कमी होऊन लसणाचा कमाल भाव 12 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 200 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 6 हजार रुपयांपासून ते 8,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Onion Potato
Pune Municipal Election Analysis: कोथरूडमधील भाजपचा बालेकिल्ला अधिक भक्कम; डेक्कन-हॅपी कॉलनीत दणदणीत विजय

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे:

कांदा - एकूण आवक 6,500 क्विंटल. भाव क्रमांक 1 - 1,800 रुपये, भाव क्रमांक 2 - 1,300 रुपये, भाव क्रमांक 3 - 700 रुपये. बटाटा - एकूण आवक - 3,000 क्विंटल, भाव क्रमांक 1 - 1,200 रुपये, भाव क्रमांक 2 - 900 रुपये, भाव क्रमांक 3 - 500 रुपये.

Onion Potato
Rajgad Trekker Death: राजगडावर दुर्दैवी घटना; चढाईदरम्यान 21 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू

फळभाज्या - एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे :

टोमॅटो - 292 क्विंटल (1,000 ते 1,500), कोबी - 195 क्विंटल (500 ते 1,000), फ्लॉवर - 180 क्विंटल (1,000 ते 1,500), वांगी - 84 क्विंटल (1,000 ते 2,000), भेंडी - 84 क्विंटल (2,000 ते 4,000), दोडका - 44 क्विंटल (5,000 ते 6,000), कारली - 48 क्विंटल (5,000 ते 6,000), दुधीभोपळा - 24 क्विंटल (3,000 ते 4,000), काकडी - 60 क्विंटल (2,000 ते 3,000), फरशी - 40 क्विंटल (2,000 ते 3,000), वालवड - 84 क्विंटल (1,500 ते 2,500), ढोबळी मिरची - 146 क्विंटल (3,000 ते 4,000), चवळी - 48 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा - 360 क्विंटल (2,000 ते 2,500), गाजर - 160 क्विंटल (1,500 ते 2,000), गवार - 26 क्विंटल 7,000 ते 9,000), आले - 175 क्विंटल (3,000 ते 4,000).

Onion Potato
Pune Airport Traffic Growth: पुणे विमानतळाची भरारी; प्रवासी, उड्डाणे व कार्गो वाहतुकीत मोठी वाढ

पालेभाज्या: पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी - एकूण 34 हजार 272 जुड्या (300 ते 550 रुपये), कोथिंबीर - एकूण 46 हजार 980 जुड्या (300 ते 760 रुपये), शेपू - एकूण 1 हजार 400 जुड्या (500 ते 800 रुपये), पालक - एकूण 8 हजार 941 जुड्या (300 ते 500 रुपये).

जनावरे: जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 55 जर्सी गायींपैकी 38 गायींची विक्री झाली (15,000 ते 70,000 रुपये), 105 बैलांपैकी 65 बैलांची विक्री झाली (10,000 ते 40,000 रुपये), 140 म्हशींपैकी 125 म्हशींची विक्री झाली (30,000 ते 80,000 रुपये), 10,600 शेळ्या-मेंढ्यांपैकी 10 हजार 400 शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news