Chakan Market Onion Price: चाकण मार्केटमध्ये कांद्याचा भाव ४ हजारांवर; पालेभाज्या मात्र कवडीमोल!

आवक वाढूनही कांदा-बटाट्याचे दर तेजीत; दुपारनंतर मेथी, शेपू, कोथिंबीर चक्क १ रुपयात विकली, बाजाराची २.६० कोटींची उलाढाल
Onion
OnionPudhari
Published on
Updated on

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ होऊनही कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कांद्याचे कामाल भाव प्रतिक्विंटलला ४ हजार रुपयांवर पोहचले आहेत. तळेगाव बटाट्याची आवक वाढून देखील प्रतवारीनुसार ८०० ते १५०० रुपये दर मिळत आहेत. पालेभाज्यांची आवक वाढली; मात्र मागणीअभावी दरात मोठी घसरण झाली. येथे दुपारनंतर चक्क १ रुपये दराने मेथी, शेपू, कोथिंबिरीची विक्री झाली. दरम्यान, चाकण मार्केटमध्ये एकूण उलाढाल २ कोटी ६० लाख रुपये झाली.

Onion
Pune Fish Market Prices: श्रावणाचा परिणाम! पुण्यात मासळी, चिकन-मटण आणि अंड्यांची मागणी घटली; भाव मात्र स्थिर

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २ हजार १०० क्विंटल झाली. कांद्याला कमाल भाव १५०० ते ४००० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १७५० क्विंटल झाली. बटाट्याला कमाल भाव १,५०० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक ४५ क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव १६ हजार रुपयांवरच स्थिरावला.

Onion
Bhor Rajgad Protest: मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे लेखी आश्वासन; भोर-राजगडच्या शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन मागे

शेतीमालाची आवक व बाजारभाव - कांदा : एकूण आवक - २१०० क्विंटल. भाव क्र. १ - ४००० रुपये, भाव क्र. २ - ३४०० रुपये, भाव क्र. ३ - १५०० रुपये. बटाटा - एकूण आवक -‌ १७५० क्विंटल. भाव क्र. १ - १,५०० रुपये, भाव क्र. २ - १,२०० रुपये, भाव क्र. ३ - ८०० रुपये.

Onion
Pune Ganeshotsav: पुण्यात गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त करा; सर्वपक्षीय नेत्यांची पोलिसांकडे मागणी

फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मिळालेला दर. टोमॅटो - ३७५ क्विंटल (५०० ते १५०० रुपये), कोबी - २३० क्विंटल (८०० ते १५००), फ्लॉवर - १६० क्विंटल (८०० ते ३,०००), वांगी - ९६ क्विंटल (१,००० ते १५००), भेंडी - ११४ क्विंटल (१ ते ३ हजार), दोडका - ६२ क्विंटल (१५०० ते ४,०००), कारली - ८५ क्विंटल ( २००० ते ३,५०० रु.), दुधीभोपळा - ५० क्विंटल (८०० ते २,५००), काकडी - ९२ क्विंटल (८०० ते २,०००), फरशी - २८ क्विंटल (३ ते ५ हजार), वालवड - ८४ क्विंटल (१,५०० ते ३,५००), ढोबळी मिरची - १६८ क्विंटल (१,००० ते २५००), चवळी - ५० क्विंटल (२ ते ४ हजार), शेवगा - ६७ क्विंटल (२ ते ५ हजार), गाजर - १६५ क्विंटल (१,५०० ते २,०००), गवार - ४८ क्विंटल (२ ते ६ हजार), आले - १८० क्विंटल (७,०० ते १२,०००).

Onion
Pune Investment Fraud: कच्च्या तेलातील गुंतवणुकीचे आमिष; १० जणांना २ कोटी ७४ लाखांची चपत

पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये आणि भाज्यांना मिळालेले भाव : मेथी - एकूण १२ हजार ७९० जुड्या (६०० ते १,३०० रुपये), कोथिंबीर - एकूण ३४ हजार १८० जुड्या (१०० ते ५००), शेपू - एकूण ७ हजार ८९५ जुड्या (३०० ते ८००), पालक - एकूण ६ हजार ९३४ जुड्या (२०० ते ७००).

जनावरे : येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ७५ जर्सी गायींपैकी ६५ गायींची विक्री झाली. त्यांना १५ ते ७० हजार रुपये दर मिळाला. १०५ बैलांपैकी ८५ बैलांची विक्री झाली. त्यांना १० ते ४० हजार दर मिळाला. १९० म्हशींपैकी १७२ म्हशींची विक्री झाली. त्यांची विक्री ३० ते ८० रुपयांत झाली. ४८०० शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news