Pune Fish Market Prices: श्रावणाचा परिणाम! पुण्यात मासळी, चिकन-मटण आणि अंड्यांची मागणी घटली; भाव मात्र स्थिर

गणेश पेठ बाजारात समुद्री मासळीची ५ ते १० टन आवक; मागणी-पूरवठ्यात समतोल असल्याने दरांमध्ये मोठा बदल नाही
Fish
Fish Pudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून मासळी गणेश पेठेतील मासळी बाजारात दाखल होत आहे. श्रावण महिना सुरू असल्याने मासळीसह चिकन, मटण आणि अंड्यांंना मागणी कमी आहे. बाजारात होत असलेल्या मागणीवरून व्यापारीवर्ग मासळी मावीत आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलामुळे मासळीसह मटण, चिकन आणि अंड्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे.

Fish
Bhor Rajgad Protest: मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे लेखी आश्वासन; भोर-राजगडच्या शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन मागे

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 23) खोल समुद्रातील मासळी ५ ते १० टन, खाडीच्या मासळीची सुमारे १०० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची १०० ते २०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे ५ ते १० टन इतकी आवक झाली.

Fish
Pune Ganeshotsav: पुण्यात गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त करा; सर्वपक्षीय नेत्यांची पोलिसांकडे मागणी

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १४००-१५००, मध्यम : १०००-१२००, लहान : ९००-९००, भिला : ५००-६००, हलवा : ८००-९००, सुरमई ७००-९००, रावस : ८००-९००, घोळ : ८००-९००, करली : ३००-३५०, भिंग : ३००-४००, पाला : ८००-१२००, वाम : ६००-८००, ओले बोंबील : २००-३००.

Fish
Pune Investment Fraud: कच्च्या तेलातील गुंतवणुकीचे आमिष; १० जणांना २ कोटी ७४ लाखांची चपत

कोळंबी : लहान : २५०-३५०, मोठी : ३५०-४५०, जम्बो प्रॉन्स : १०००-१२००, किंग प्रॉन्स : ६००-७००, लॉबस्टर : १५००-१८००, मोरी : ३००-४००, मांदेली : २००-२५०, राणीमासा : २५०-३००, खेकडे : ३००-३५०, चिंबोर्‍या : ५००-६००. खाडीची मासळी - सौंदाळे : २५०-३००, खापी : २५०-३००, तांबोशी : ४००-५००, पालू : २५०-३००, लेपा : ३००-५००, बांगडा : २००-३००, शेवटे : २००-२५०, बेळुंजी : १५०-२००, तिसर्‍या : २५०-३००, खुबे : १००-१५० तारली : २००.

Fish
Pune Country Made Pistols Seized: सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई; तीन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

नदीतील मासळी : रहू : १५०-१८०, कतला : १८०-२५०, मरळ : ३००-३५०, शिवडा : २००-२२०, खवली : १८०-२२०, आम्ळी : १००-१५०, खेकडे : २५०-३५०, वाम : ४००-४५०. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २१०, लेगपीस २६०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस ३००. अंडी : गावरान (शेकडा) ११२० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ५६०, डझन ८४, प्रतिनग ७.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news