

प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर: माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत अपक्षांनी 5 जागा जिंकत बाजी मारल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार व रंजन तावरे यांच्या युतीला कुठेतरी अपक्षांनी छेद करीत ‘दे धक्का’ दिल्याचे चित्र पाहावयास मिळते. या निवडणुकीत अजित पवार व त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक रंजन तावरे यांनी ऐनवेळी एकत्र येत युती केली होती. मात्र, हा निर्णय घेताना पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना तसेच नेतेमंडळींना विश्वासात न घेता निर्णय झाल्याचे बोलले गेले, तर हा निर्णय भाजप व राष्ट्रवादी काँग््रेासच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी घेतल्याची चर्चा देखील झाली.
माळेगाव ग््राामपंचायतीचा पूर्वेतिहास पाहता रंजन तावरे यांचे वर्चस्व अनेकवेळा सिद्ध झाले आहे, त्याचा विचार करून अजित पवार यांनी राज्याचे नेतृत्व करताना बारामतीनजीक असलेल्या माळेगाव नगरपंचायतीमध्ये कदाचित मागील इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर त्याचे राजकीय पडसाद राज्यभर उमटतील म्हणून रंजन तावरे यांच्याशी युती केली, तर रंजन तावरे यांनी देखील माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत झालेला पराभव पाहता चाणक्य नीतीचा अवलंब करत पारंपरिक विरोधक अजित पवारांशी असलेला संघर्ष बाजूला ठेवून युती केली, मात्र ही युती स्थानिक राष्ट्रवादी काँग््रेासचे नेते तसेच कार्यकर्ते यांना रुचली नाही.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लागलीच काही प्रमाणात अपक्ष निवडून येतील, असा अंदाज जाणकारांसह नागरिकांकडून व्यक्त होऊ लागला, तर लागलेल्या निकालावरून केलेले अंदाज अखेर खरे ठरले. राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाच्या घड्याळ चिन्हावर नगराध्यक्षासह एकूण 12 जागांवर उमेदवार उभे होते, यापैकी नगराध्यक्षांसह एकूण 9 जागांवर उमेदवार निवडून आले तर 3 जागांवर अपक्षांनी बाजी मारली म्हणजेच राष्ट्रवादी काँग््रेासच्या घड्याळ चिन्हाचे 3 उमेदवार पराभूत झाले. तर जनमत आघाडीने एकूण 5 जागांवर आपले उमेदवार दिले असताना त्यांचे फक्त 3 उमेदवार निवडून आले तर उर्वरित 2 जागांवरती अपक्षांनी बाजी मारली. तर भाजप व राष्ट्रवादी काँग््रेास पुरस्कृत 1 उमेदवार निवडून आला. एकूणच राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष अजित पवार व रंजन तावरे यांच्या युतीला अपक्षांनी 5 जागा जिंकत दे धक्का दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नाराजांची भूमिका महत्त्वाची ठरली
अजित पवारांचे निकटवर्ती असलेले दीपक तावरे यांनी अजित पवार यांच्यासमोर या युतीबाबत उघड-उघड नाराजी व्यक्त करीत अपक्ष उमेदवारांना ताकद दिल्याचे मानले जाते. एकूणच, राष्ट्रवादी काँग््रेासच्या स्थानिक अंतर्गत नाराजीच्या नाट्यामुळेच 5 अपक्ष उमेदवार निवडून आल्याची चर्चा आहे.
जयदीप दिलीप तावरे उच्चांकी मतांनी निवडून आले
राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे उमेदवार जयदीप दिलीप तावरे यांना उमेदवारी मिळवण्यापासून संघर्ष करावा लागला. यामध्ये त्यांचे वडील दिलीपनाना तावरे सरपंच असताना केलेली कामे तसेच त्यानंतर जयदीप तावरे यांनी सरपंच असताना केलेली कामे लक्षात घेऊन अजित पवार यांनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले, तर अजित पवार यांच्या विश्वासास पात्र राहून जयदीप दिलीप तावरे यांनी झालेल्या मतदानापैकी 71 टक्के मतदान घेत सर्वांत उच्चांकी मतांनी विजय संपादन केला.
नेतृत्व अजित पवारांचे; पण अपक्षांचा वेगळा गट?
माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत 17 नगरसेवकांपैकी 5 नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आले आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नगरपंचायतीवर वर्चस्व असून, अजित पवारांच्या नेतृत्वातच अपक्षांचा वेगळा गट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.