Divya Shinde Extortion Case: ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेकडून डॉक्टरकडे ५ लाखांची मागणी; घरात घुसून मारहाण

कला आविष्कार महोत्सवाच्या प्रसिद्धीचे कारण; माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला गंभीर दुखापत, आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा
Divya Shinde Extortion Case
Divya Shinde Extortion CasePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या ‘कला आविष्कार महोत्सवा’ची प्रसिद्धी केल्याच्या नावाखाली पाच लाख रुपयांची खंडणी मागत ‘बिग बॉस मराठी’ फेम रीलस्टार दिव्या शिंदे हिने साथीदारांसह पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड (वय ६५) यांच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला केला.

Divya Shinde Extortion Case
Pune Ganpati Visarjan 2026 Live: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन, पांचाळेश्वर घाटावर बाप्पाला भावपूर्ण निरोप

याप्रकरणी दिव्या शिंदे (रा. सनसिटी, सिंहगड रस्ता), आण्णा ढमढेरे (रा. पिंपरी) यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(४), ३३३, १०९(१), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० आणि ३२४(४) अन्वये काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Divya Shinde Extortion Case
Pune Ganpati Visarjan 2026: कसबा ते केसरीवाडा... मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक कुठून निघाली आणि विसर्जन कधी झाले? संपूर्ण माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, डॉ. गायकवाड हे २०२१ मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले असून, करुणादीप फाउंडेशनचे सदस्य आहेत. या संस्थेच्या वतीने १ ते ३ सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ झाला. या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे हिला गायकवाड किंवा संस्थेकडून कोणतेही अधिकृत आमंत्रण देण्यात आले नव्हते आणि कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासही तिला कोणी सांगितले नव्हते. मात्र, प्रसिद्धी केल्याचे सांगून ऑगस्टपासून तिने गायकवाड यांच्याकडे फोन व संदेशांद्वारे पाच लाख रुपयांची मागणी सुरू केली.

Divya Shinde Extortion Case
Daund Ganesh Visarjan: डीजेवर राहणार पोलिसांची करडी नजर; २९० अधिकारी, कर्मचारी तैनात

१७ सप्टेंबरला दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे आणि अन्य काही जण गायकवाड यांच्या घरी गेले. ते घरी नसल्याने पत्नी व मुलाला दमदाटी करून ते निघून गेले. २३ सप्टेंबरला ढमढेरे याने फोन करून गायकवाड यांना हॉटेल ब्ल्यू नाईन येथे बोलावले. तेथे पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास दोन दिवसांत घरी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. दि. २४ सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास गायकवाड घरी एकटे असताना ढमढेरे तेथे आला. दरवाजा उघडताच दिव्या शिंदेसह आठ ते दहा जण घरात घुसले. त्यांनी गायकवाड यांच्या तोंडावर, पोटावर व पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “माझा माणूस पैसे घेण्यासाठी आला होता; तू पैसे का दिले नाहीस?”, त्यानंतर त्यांना जिवंत सोडू नका, अशा आशयाची चिथावणी देण्यात आली.

गायकवाड यांनी आपण पक्षाघाताचे रुग्ण असल्याचे सांगून मारहाण थांबविण्याची विनवणी केली. मात्र, एकाने धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केला. त्यानंतर दांडके, कमरेचे पट्टे आणि लोखंडी भांड्याने मारहाण करण्यात आली. गायकवाड यांच्या पत्नीबाबत धमकी देत त्यांचे तुकडे करण्याची धमकीही देण्यात आली.

Divya Shinde Extortion Case
Vidyanand Bapat: गणेशोत्सवानंतर काय करणार? विद्यानंद बापटांनी सांगितला पुढचा प्लॅन, राजकारणाच्या चर्चांना दिला पूर्णविराम

काही वेळाने मुलगा व सून घरी आल्यानंतर त्यांनाही दमदाटी करण्यात आली. पाच लाख रुपये न दिल्यास कार नेण्याची धमकी देत गायकवाड यांची कार घेऊन आरोपी निघून गेले. घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. गंभीर जखमी गायकवाड यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.

कार्यक्रम संस्थेने आयोजित केला होता. मी केवळ संस्थेचा सदस्य आहे. मला पक्षाघात झाला असून माझी प्रकृतीही ठीक नाही. कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी दिव्या शिंदे हिला कोणीही सांगितले नव्हते किंवा कोणतेही अधिकृत आमंत्रण दिले नव्हते. तरीही माझ्याकडे पाच लाख रुपये मागण्यात आले

डॉ. विद्याधर गायकवाड, माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news