Pune Ganpati Visarjan 2026 Live: कसबा गणपतीची आरती संपन्न; गणराया आता पालखीत विराजमान होणार, मिरवणुकीची उत्सुकता शिगेला!

Pune Ganpati Visarjan 2026 LIVE Updates: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून लक्ष्मी रोडसह शहरातील प्रमुख मार्गांवर भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Pune Ganpati Visarjan 2026 Live
Pune Ganpati Visarjan 2026 LivePudhari

Pune Ganpati Visarjan 2026 LIVE Updates: पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोड, मंडई परिसर आणि मध्यवर्ती पुण्यातील मिरवणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दगडूशेठ हलवाई गणपतीसह मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीतील महत्त्वाचे क्षण, ढोल-ताशांचा गजर, भक्तांची गर्दी आणि विसर्जनाशी संबंधित ताज्या घडामोडींचे LIVE अपडेट्स येथे जाणून घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Pune Ganpati Visarjan 2026 LIVE Updates: कसबा गणपतीची आरती संपन्न; गणराया आता पालखीत विराजमान होणार, मिरवणुकीची उत्सुकता शिगेला!

पुणे : पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला आता सुरुवात झाली आहे. गणरायाची आरती संपन्न झाली असून, आता बाप्पा पालखीत विराजमान होणार आहेत. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गणपतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यामुळे पुण्यातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कसबा गणपती हा पुण्याच्या गणेशोत्सवातील अत्यंत महत्त्वाचा मानाचा गणपती मानला जातो. विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पहिल्या गणपतीला विशेष स्थान असून, या सोहळ्याला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.

Pune Ganpati Visarjan 2026 LIVE Updates: दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीकडे सर्वांचे लक्ष

दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्यातील गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

Pune Ganpati Visarjan 2026 LIVE Updates: मानाचे 5 गणपती पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे. या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आणि मिरवणूक पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजर आहेत.

Pune Ganpati Visarjan 2026 LIVE Updates: लक्ष्मी रोडवर भक्तांची मोठी गर्दी

पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीतील लक्ष्मी रोड हा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत.

ढोल-ताशा पथके, पारंपरिक वाद्ये आणि गणपती बाप्पाच्या जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news