Pune Police Drug Analyzer: नाकाबंदीत ‘ड्रग ॲनालायझर’चा वापर; पुणे पोलिसांची अमली पदार्थांविरोधात नवी मोहीम

लाळेच्या नमुन्यावर काही मिनिटांत प्राथमिक निष्कर्ष; ड्रग साखळी तोडण्यावर भर
Police Drug Analyzer
Police Drug AnalyzerPudhari
Published on
Updated on

महेंद्र कांबळे

पुणे: मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बिथ ॲनालायझरच्या धर्तीवर आता शहरात ‌‘ड्रग ॲनालायझर‌’ वापरण्याची तयारी पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. अमली पदार्थ सेवन करून वाहन चालविणाऱ्यांची तपासणी नाकाबंदीच्या वेळी या मशिनद्वारे करण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‌ ‘दै. पुढारी‌’शी बोलताना दिली.

Police Drug Analyzer
Bhigwan Kidnaping Case: भिगवण अपहरण प्रकरणाला कलाटणी; तरुणीचा न्यायालयात जबाब, कुटुंबासोबत जाण्यास नकार

आयटी क्षेत्राचे वलय, शैक्षणिक संस्था, औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने होणारा विस्तार. त्यामुळे देश- विदेशातील तरुण-तरुणींचा मोठा राबता पुण्यात असतो. तसेच अलीकडे सुरू झालेले नाईट लाईफचे कल्चर यामुळे अमली पदार्थ तस्करांनी गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकांकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्कारांवर कारवाई करण्यात येत आहे. तरीसुद्धा या नशेच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नाकाबंदीच्या वेळी पोलिस आता मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची ज्या प्रमाणे चाचणी करतात, तशीच ड्रग ॲनालायझर मशिनद्वारे अमली पदार्थ सेवन करून वाहन चालणाऱ्यांची चाचणी करणार आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना ड्रग सेवन करणाऱ्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जाते आहे.

Police Drug Analyzer
Pune Municipal Corporation Budget 2026-27: पुणे महापालिकेचे 2026-27 अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात; १५ हजार कोटींचा टप्पा पार होणार?

येथे होणार चाचणी

  • शहरातील प्रमुख नाकाबंदी पॉइंट

  • महामार्ग व प्रवेशद्वारे

  • नाईट लाईफ परिसर व पब-रेस्टॉरंट्‌‍सजवळ

  • अपघातप्रवण भाग

  • तस्करीच्या संशयित हालचाली असलेले संवेदनशील भाग

काम जलद, तत्काळ प्राथमिक निष्कर्ष

  • काही मिनिटांत प्राथमिक निष्कर्ष

  • रस्त्यावरच कारवाईची शक्यता

  • रक्त तपासणीची गरज नाही

  • तस्करीच्या साखळीवर तत्काळ अंकुश

  • तरुणांमध्ये प्रतिबंधात्मक संदेश

Police Drug Analyzer
Pune Cyber Fraud: पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; हॉटेल बुकिंग, क्रेडिट कार्ड व गुंतवणुकीत लाखोंची फसवणूक

...असे काम करणार मशिन

एखाद्या व्यक्तीने अमली पदार्थाचे (ड्रग) सेवन केले की नाही, हे ठरवण्यासाठी सुरुवातीला रक्त चाचणी करावी लागत असे. मात्र, या मशिनद्वारे चाचणी करताना संशयित व्यक्तीच्या लाळेचा नमुना विशेष पट्टीद्वारे घेतला जाईल. ती पट्टी यंत्रात ठेवताच काही मिनिटांत प्राथमिक निष्कर्ष समोर येईल. संबंधित व्यक्तीने गांजा, कोकेन, मेफेड्रोन, एमडीएमए किंवा इतर तत्सम अमली पदार्थ सेवन केले आहेत का, याचे संकेत या उपकरणाद्वारे मिळण्यास मदत होईल. सकारात्मक निष्कर्ष आल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया व कायदेशीर कारवाई करणे पोलिसांना सोपे होईल. त्याच आधारे मूळ ड्रग तस्करापर्यंही पोलिसांना पोहोचणे व लिंक बेकअप करणे सोपे होणार आहे. सध्या हे मशिन नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो तसेच केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्याकडून वापरले जात आहे. राज्यातील काही शहरांमध्ये याचा यशस्वी वापर झाल्यानंतर पुण्यात त्याची अंमलबजावणी होणार आहे.

Police Drug Analyzer
Pune Riverfront Project: मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; वाकड-सांगवी टप्प्यावरून नागरिकांचा सवाल

ड्रगची साखळी तोडणे हाच प्रमुख उद्देश

बिथ ॲनालायझरप्रमाणेच ‌‘ड्रग ॲनालायझर‌’ही प्रभावी ठरेल. याचा उद्देश अमली पदार्थां विरोधातील प्रतिबंधात्मक मोहीम अधिक मजबूत करणे तसेच ड्रगची साखळी तोडणे, असा असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‌‘ड्रग ॲनालायझर‌’मुळे शहरातील तपासणी व्यवस्था अधिक शास्त्रशुद्ध आणि प्रभावी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तस्कर आणि अमली पदार्थ सेवन करून वाहन चालविणाऱ्यांसाठी हे पाऊल धोक्याची घंटा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news