Bhimashankar Temple Online Booking: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी ऑनलाइन पास अनिवार्य; दररोज 1000 भाविकांना प्रवेश

ऑनलाइन नोंदणीशिवाय प्रवेश नाही; 30 जून 2026 पर्यंत दर्शन सुविधा सुरू
Bhimashankar Temple
Bhimashankar TemplePudhari
Published on
Updated on

पुणे: भीमाशंकर मंदिर आज सोमवार पासून दर्शनासाठी सुरु झाले असून मंदिरात प्रतिदिन एक हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या https://shreebhimashankar.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पास उपलब्ध होणार आहे.

Bhimashankar Temple
ICSI Amnesty Scheme: ICSI अभय योजना सुरू; कंपनी सचिव अभ्यासक्रम पूर्ण करण्याची पुन्हा संधी

नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर होणार असून त्याच भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येणार आहे.दर्शनाकरता पास अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Bhimashankar Temple
Pune Revenue Department Transfer: पुणे महसूल विभागात 285 कर्मचाऱ्यांच्या बदल्या; समुपदेशनाद्वारे प्रक्रिया

भाविकांना ३० जून २०२६ पर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ वा. दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Bhimashankar Temple
Maharashtra Dam Water Storage Order: धरणांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत साठा राखण्याचे आदेश

सन पुढील वर्षांत २०२७ मधील नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ २०२५ च्या अनुभवाच्या आधारे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. संभाव्य वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सध्या भीमाशंकर येथे सुरू आहेत.

Bhimashankar Temple
Mula Mutha River Pollution: मुळा-मुठा नदी प्रदूषणाचा ग्रामीण भागावर गंभीर फटका; 80 गावांमध्ये पाण्याचे संकट

मुख्य सभामंडपाचे काम पूर्ण करण्यात आले असून दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा व गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत कामे पूर्ण झाली आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात असून उर्वरित किरकोळ कामे जलदगतीने पूर्ण करुन बांधकाम साहित्य, दगड व यंत्रसामग्री हटवून परिसर भाविकांसाठी मोकळा करण्याच्यादृष्टीने श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांनी आजपासून दर्शनाकरिता खुले करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news