Pune Revenue Department Transfer: पुणे महसूल विभागात 285 कर्मचाऱ्यांच्या बदल्या; समुपदेशनाद्वारे प्रक्रिया

जिल्हाधिकारी कार्यालयात पारदर्शक पद्धतीने बदल्या होणार; बाह्य दबावास मनाई
Department Transfer
Department TransferPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे जिल्ह्यातील महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी आणि महसूल सहायक यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया आज सोमवारी (दि.१५ जून) पार पडणार असून, एकूण २८५ कर्मचारी बदलीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात समुपदेशना द्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Department Transfer
Maharashtra Dam Water Storage Order: धरणांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत साठा राखण्याचे आदेश

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम २००५ तसेच शासनाच्या विद्यमान धोरणानुसार बदल्या केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील ९२९ मंजूर ग्राम महसूल अधिकारी पदांपैकी ८८२ पदे कार्यरत असून, त्यातील १०७ कर्मचारी बदलीपात्र आहेत.

Department Transfer
Mula Mutha River Pollution: मुळा-मुठा नदी प्रदूषणाचा ग्रामीण भागावर गंभीर फटका; 80 गावांमध्ये पाण्याचे संकट

याशिवाय, ५७ सहायक महसूल अधिकारी, ३४ मंडळ अधिकारी आणि ८७ महसूल सहायक यांचाही समावेश बदलीपात्र कर्मचाऱ्यांमध्ये आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात सकाळी १० वाजल्यापासून समुपदेशन प्रक्रिया सुरू होणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले असून, अनुपस्थित राहणाऱ्यांना उपलब्ध रिक्त पदांवर प्रशासकीय सोयीने पदस्थापना दिली जाणार आहे.

Department Transfer
SRA Scam: पिंपरी-चिंचवड एसआरए घोटाळा तापला; अधिकाऱ्यांवर गैरव्यवहार दडपण्याचा गंभीर आरोप

निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले, की बदली प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि शासनाच्या नियमांनुसार राबविण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची पात्रता, अनुभव, कार्यक्षमता आणि उपलब्ध रिक्त पदांचा विचार करून समुपदेशनाद्वारे निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप किंवा दबाव सहन केला जाणार नाही.

Department Transfer
Pune Land Fraud: पुरंदरमध्ये ४३ लाखांची जमीन फसवणूक; सासवड पोलिसांत पाच जणांवर गुन्हा

दरम्यान, बदल्यांबाबत राजकीय अथवा इतर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांनुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news