Bhimashankar Ropeway: रोप-वे प्रकल्पासाठी सुमारे 200 कोटी खर्च अपेक्षित

उभारणीसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी दाखविली रुची; प्रवासासाठी साधारण 50 ते 200 दरम्यान दर ठेवण्याचा विचार
Bhimashankar Ropeway
रोप-वे प्रकल्पासाठी सुमारे 200 कोटी खर्च अपेक्षितPudhari
Published on
Updated on

मंचर : श्रीक्षेत्र भीमाशंकरला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केबल प्रणाली, दोन प्रवासी स्थानके, पार्किंग व्यवस्था, तिकीट कक्ष, सुरक्षा नियंत्रण आणि आपत्कालीन यंत्रणा यांचा समावेश असेल.(Latest Pune News)

Bhimashankar Ropeway
‌Malegaon Sugar Factory: ‘माळेगाव‌’चा अंतिम ऊसदर 3450 रुपये

रोप-वे उभारणीसाठी काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी प्राथमिक रुची दाखवली असून, तांत्रिक तपशील अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. एकदा मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास 2 ते 3 वर्षे लागण्याची शक्यता आहे. सरकारकडून पर्यावरणीय मंजुरी, वन विभागाची परवानगी आणि स्थानिक ग्रामपंचायतींचा सल्ला घेतल्यानंतर प्रकल्पाचे अंतिम रूप निश्चित केले जाणार आहे. रोप-वे प्रवासासाठी दर साधारण 50 ते 200 दरम्यान ठेवण्याचा विचार आहे, जे सर्वसामान्य भाविकांसाठी परवडणारे ठरेल.

Bhimashankar Ropeway
Saswad Election: सासवडमध्ये धनुष्य पेलणार की कमळ फुलणार? नगरपरिषदेच्या निवडणुकीत रंगणार शिंदे विरुद्ध भाजप सामना

प्रवाशांसाठी वातानुकूलित गोंडोला (केबिन), उच्च सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन बेकिंग सिस्टिम, वीज बॅकअप आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध राहतील. रोप-वेच्या स्थानकाजवळ पार्किंग, शौचालय, माहिती केंद्र, भोजनालय आणि धार्मिक साहित्य विक्री केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे भीमाशंकर हे केवळ धार्मिक नव्हे तर पर्यटनदृष्ट्‌‍या आकर्षण बनण्याची शक्यता आहे.

Bhimashankar Ropeway
Khadakwasla NDA: खडकवासल्यात 18 वर्षांच्या एनडीए कॅडेटने उचललं टोकाचं पाऊल, चौकशी समिती शोधणार कारण

भाडे तसेच सुविधा सुरक्षित आणि परवडणारी ठेवल्यास प्रवासी रोप-वे अधिक वापरतील. वातानुकूलित गोंडोला, आपत्कालीन यंत्रणा आणि पार्किंग सुविधा प्रवास आणखी सोईस्कर करतील, हे नक्की.

रमेश लबडे, उद्योजक, पुणे

प्रकल्पाचा खर्च आणि कालावधी विचारात घेतल्यास रोप-वे केवळ प्रवाशांना सुविधा देणार नाही, तर स्थानिक रोजगारनिर्मितीला देखील चालना देईल, ही बाब खूप महत्त्वाची आहे.

प्रवीण बढेकर, बढेकर ग्रुप, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news