Bhide Wada Memorial: भिडे वाडा स्मारकाचे मार्च २०२७ पूर्वी उद्घाटन; २०० कोटींच्या निधीची तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा मानस; महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा इतिहास होलोग्राम, ऑडिओ-व्हिडीओद्वारे उलगडणार
Mahatma Phule Wada
Mahatma Phule WadaPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करून मार्च-एप्रिलपर्यंत त्याचे उद्‍घाटन करण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. अनेक वर्षे न्यायालयीन लढाई, बैठका आणि पाठपुरावा केल्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागला असून, केवळ इमारत उभारण्याऐवजी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास दृश्य स्वरूपात नागरिकांसमोर उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Mahatma Phule Wada
Nira River Water Release: निरा नदीत पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध; कालव्याला आवर्तन देण्याची मागणी

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी भिडे वाडा स्मारकाची पाहणी केली. यावेळी आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त बिपीन शिंदे, उपायुक्त अविनाश सपकाळ हे उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, भिडे वाडा, सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली देशातील पहिली मुलींची शाळा, महात्मा फुले-सावित्रीबाईंचे निवासस्थान, सावित्रीबाई फुले स्मारक या सर्व ऐतिहासिक स्थळांचा एकात्मिक विचार करून मोठे स्मारक उभारण्याची संकल्पना आहे.

Mahatma Phule Wada
Pune Traffic Diversion: अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल; दोन दिवस अनेक रस्त्यांवर वाहनांना बंदी

सध्या या परिसरात एक बसही व्यवस्थित उभी राहू शकत नसल्याने वाहतूक, पार्किंग आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यावरही भर दिला जात आहे. या प्रकल्पाची इमारत जवळपास पूर्णत्वाकडे आली असली, तरी त्यातील आशयपूर्ण मांडणी हे मोठे आव्हान आहे. स्मारकात होलोग्राम, ऑडीओ-व्हिडीओ माध्यमे आणि दृश्य स्वरूपातील सादरीकरणाद्वारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा इतिहास उलगडण्यात येणार आहे. त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीला विविध जाती-धर्मांतील नागरिक आणि महिलांनी दिलेले योगदानही या माध्यमातून नव्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कामासाठी महापालिकेने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली असून, वास्तुविशारद आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जात आहे.

Mahatma Phule Wada
Pune FDA Raids: पुण्यातील ‘वैशाली’ आणि ‘रूपाली’ रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

भुजबळ म्हणाले, भिडे वाड्याचा प्रश्न तब्बल दोन दशकांहून अधिक काळ न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रियेत अडकला होता. विविध संघटना, कार्यकर्ते, वकील आणि अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनंतर हा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. फुले स्मारकासाठी जागा ताब्यात घेणे आणि बाधितांचे सहकार्य मिळविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या विषयावर मुंबईत अनेक बैठका झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Mahatma Phule Wada
Hadapsar Shooting Range: हडपसरमधील कोट्यवधींची शूटिंग रेंज बंद; नेमबाज खेळाडूंचे भविष्य टांगणीला!

२०० कोटींच्या निधीची तयारी; अडथळा सहकार्याचा

भिडे वाडा आणि फुले स्मारक प्रकल्पासाठी निधीची कमतरता नाही. राज्य सरकारकडून सुमारे २०० कोटी रुपये देणार आहे. मात्र, जागा ताब्यात घेणे, बाधितांना न्याय देणे आणि सर्व संबंधितांचे सहकार्य मिळविणे आवश्यक आहे. कोणावर अन्याय करणे हा प्रकल्पाचा उद्देश नसून, सामाजिक क्रांतीचा इतिहास जतन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्याचा मानस

भिडे वाड्याचे काम सुरू झाल्याने समाधान असले, तरी अपेक्षेप्रमाणे आणि वेळेत संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने समाधान मिळेल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. काम रखडत असल्याच्या तक्रारी आपण सातत्याने मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे आणि संबंधित समित्यांसमोर मांडल्या. त्याचा परिणाम म्हणून आता महापालिका आयुक्त स्वतः या कामात लक्ष घालत असून, आयुक्तांनी ठरविल्यास कोणतेही काम अशक्य नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते व्हावी, अशी आमची इच्छा आहे. बरेच काम पूर्ण झालं आहे. मार्च २०२७ च्या आधी भिडे वाड्याचे आपण उद्घाटन करू शकू, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.