Bay of Bengal Weather System: बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रावर परिणाम होणार?

नोव्हेंबरअखेरीस प्रणाली विकसित होण्याची शक्यता
Bay of Bengal Weather System
Bay of Bengal Weather SystemPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: बंगालच्या उपसागरात नोव्हेंबरअखेरीस आणखी एक चक्रीवादळाची प्रणाली विकसित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधित कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर अखेरपासून बंगालच्या उपसागरात अर्णब, मुरासू आणि अक्वान या तीन चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. आता चौथ्या चक्रीवादळाची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील काही दिवसांत समुद्रातील तापमान, वातावरणातील आर्द्रता आणि वाऱ्यांची दिशा यावर प्रणालीची वाटचाल अवलंबून असेल.

Bay of Bengal Weather System
Baramati Thar Incident: थार थांबवण्यासाठी पोलीस पुढे आले अन् चालकाने थेट अंगावरच घातली गाडी; बारामतीतील थरारक VIDEO

संभाव्य प्रणालीचा प्रभाव अंदमान-निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू तसेच पूर्व किनारपट्टीच्या काही भागांवर पडू शकतो. मात्र, सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रावर थेट परिणाम होण्याची शक्यता स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, गुरुवारी राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून, पारा १७ ते २१ अंशांवर गेल्याने उकाडा जाणवत आहे.

Bay of Bengal Weather System
Maharashtra Revenue Office GIS Map: महसूल कार्यालयांचा नकाशा आता मोबाईलवर! तलाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयांचे लोकेशन एका क्लिकवर

गुरुवारचे राज्याचे किमान तापमान

गोंदिया १२.८, मुंबई २३.९, कोल्हापूर २१.६, रत्नागिरी २३.१, पुणे १७.५, अहिल्यानगर १७.५, जळगाव १६.६, महाबळेश्वर १७.५, मालेगाव १४.६, नाशिक १४.८, सांगली २१.४, सातारा २१.२, सोलापूर २३.७, धाराशिव १७.८, छत्रपती संभाजीनगर १७.४, परभणी १८.३, नांदेड १९.१, अकोला १८, अमरावती १५.९, बुलढाणा १८.५, ब्रह्मपुरी १६.५, चंद्रपूर १८.२.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.