Maharashtra Revenue Office GIS Map: महसूल कार्यालयांचा नकाशा आता मोबाईलवर! तलाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयांचे लोकेशन एका क्लिकवर

यशदाचा जीआयएस आधारित डिजिटल नकाशा प्रकल्प; पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात अंमलबजावणी, नंतर संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार
Revenue Office GIS Map
Revenue Office GIS MapPudhari
Published on: 
Updated on: 

शिवाजी शिंदे

पुणे: शासकीय कामासाठी महसूल कार्यालयात जायचे आहे; पण संबंधित कार्यालय नेमके कोठे आहे, त्याचे कार्यक्षेत्र कोणते आणि आपले काम कोणत्या कार्यालयात होणार, याची माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना आता कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. राज्यातील तलाठी कार्यालयांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत सर्व महसूल कार्यालयांचे अचूक ठिकाण (ॲक्झॅक्ट लोकेशन) आणि त्यांचे अधिकार क्षेत्र आता नागरिकांना थेट मोबाईलवर पाहता येणार आहे.

Revenue Office GIS Map
Maharashtra Teachers Protest: १ डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे असहकार आंदोलन; ऑनलाइन कामांना देणार नकार

भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात जीआयएस नकाशाच्या माध्यमातून राज्यातील महसूल कार्यालयांची डिजिटल माहिती उपलब्ध करून देण्याचा पहिला पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या (यशदा) वतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Revenue Office GIS Map
Pune Slum Rehabilitation: पुण्यातील टेकड्यांवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार? उच्चस्तरीय समितीची राज्य सरकारला शिफारस

त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकल्प विस्तारित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, खातेदार, जमीनधारक तसेच विविध शासकीय दाखले मिळविण्यासाठी महसूल प्रशासनाशी संपर्क साधणार्‍या नागरिकांना या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः वाढती वाहतूक कोंडी, शहरांमध्ये वाढणारी स्थलांतरित लोकसंख्या आणि बदलती कार्यालयीन व्यवस्था, यामुळे अनेकांना शासकीय कार्यालये शोधताना अडचणींचा सामना करावा लागतो.

Revenue Office GIS Map
Pune Water Conservation: पुण्यातील १४४ उद्यानांना मिळणार प्रक्रिया केलेले पाणी; पिण्याच्या पाण्याचा वापर थांबवणार

ग्रामीण भागातून शहरात किंवा शहरातून एखाद्या गावात शासकीय कामासाठी जाणार्‍या नागरिकांचीही यामुळे गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील तलाठी कार्यालये, मंडल अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि महसूल प्रशासनाशी संबंधित अन्य महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांची माहिती एकाच डिजिटल नकाशावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Revenue Office GIS Map
Pune Child Sabha: पुण्याच्या विकासाचे नियोजन आता विद्यार्थी करणार! १० क्षेत्रीय कार्यालयांत २७ नोव्हेंबरला बालसभा

... असा होणार पथदर्शी प्रकल्प

  • केवळ कार्यालयाचे ठिकाणच नव्हे, तर संबंधित कार्यालयाच्या अधिकार क्षेत्राची सीमाही नकाशावर दर्शविण्यात येणार आहे.

  • एखाद्या गावचा किंवा परिसराचा महसुली कारभार कोणत्या कार्यालयाच्या अखत्यारीत येतो, हे नागरिकांना सहज समजू शकणार आहे.

  • पुणे जिल्ह्यातील प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा डिजिटल डेटा तयार केला जाईल.

  • महसूल कार्यालयांचे अचूक लोकेशन आणि अधिकार क्षेत्राची माहिती नागरिकांना मोबाईलवर उपलब्ध होईल.

  • महसूल प्रशासनाच्या कामकाजात सुलभता येण्याबरोबरच नागरिकांना शासकीय सेवा मिळविण्यासाठी होणारी धावपळही कमी होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांना आता हेलपाटे मारावे लागणार नाहीत. राज्यातील महसूल प्रशासनाचा संपूर्ण नकाशाच आता मोबाईलवर खुला होणार आहे. यशदाच्या माध्यमातून जीआयएस आधारित डिजिटल नकाशा तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

शेखर गायकवाड, अतिरिक्त महासंचालक, यशदा, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.