बारामती : चोरट्यांनी १५ तोळे सोने, पाच हजार रुपये पळविले

बारामती : चोरट्यांनी १५ तोळे सोने, पाच हजार रुपये पळविले
Published on: 
Updated on: 

भवानीनगर, पुढारी वृत्तसेवा : ढेकळवाडी (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. १६) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १५ तोळे सोने व ५ हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला. ढेकळवाडी येथील बाळकृष्ण साहेबराव टकले यांच्या ३५ फाटा येथील घराच्या स्लॅबवर चोरट्यांनी मध्यरात्रीच्या वेळेस प्रवेश केला. या स्लॅबवरून घरामध्ये येणाऱ्या जिन्याचा दरवाजा कटावणीच्या साह्याने कापून चोरट्यांनी घरांमध्ये प्रवेश केला.

कपाटातील ५ हजार रुपये रोख व किचनमधील डब्यांमध्ये ठेवलेले सोन्याचे सुमारे १५तोळ्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी डब्यामध्ये दागिने शोधत असताना किचनमधील चार पाच डबे उघडेच ठेवलेले होते, तसेच कपाटातील पैशाचे पाकीट पैसे काढून घेतल्यानंतर घराच्या छतावर फेकून दिले. हे पाहिल्यानंतर घरामध्ये चोरी झाली असल्याचे टकले कुटुंबीयांना सकाळी झोपेतून उठल्यावर कळाले. याबाबत टकले यांनी बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये खबर दिली. बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news