एकदा काय १०० वेळा अटक करा, सर्व गोष्टींचा आम्ही पर्दाफाश करणार : प्रवीण दरेकरांचे आव्हान | पुढारी

एकदा काय १०० वेळा अटक करा, सर्व गोष्टींचा आम्ही पर्दाफाश करणार : प्रवीण दरेकरांचे आव्हान

सातारा : पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची आज (दि.१७) सातारा येथे पत्रकार परिषद झाली. यामध्ये बोलत असताना त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मी राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. राज्यातील उत्तम असणाऱ्या चार ते पाच बँकांपैकी असलेली मुंबै बँक याला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे. मी राज्याचे विरोधी पक्षनेता म्हणून जनतेपुढे तुमचे खरे चित्र आणतो आहे. असे प्रवीण दरेकर म्हणाले.

यामुळे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला अटक केलं जात आहे. परंतु असल्या गोष्टींना मी घाबरत नाही एकदा काय १०० वेळा अटक करा आणि आता अधिवेशनामध्ये सर्व गोष्टींचा आम्ही पर्दाफाश करणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाची मजूर असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने अडचणीत सापडलेल्या भाजप नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी वकीलांनी उत्तर देण्यासाठी मागितला वेळ आहे.

दरेकर यांनी काल उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा रद्द करा अशी विनंती केली होती, तसेच अटकेपासून संरक्षण द्या अशी विनंती केली होती. ही विनंती उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळून लावताना अटकपूर्व जामीनासाठी रितसर मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करा असे निर्देश दिले होते.

Back to top button