Baramati Shakambhari Devi Temple: बारामतीतील शाकंभरीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम; जीर्णोद्धारासाठी भाविकांना मदतीचे आवाहन

१९५० च्या दशकात मंदिराची स्थापना; भजन, अभिषेक, श्रीसूक्त आणि दुर्गा सप्तशती पाठवाचनाने परिसरात भक्तिमय वातावरण
Shakambhari Devi
Shakambhari DeviPudhari
Published on: 
Updated on: 

जळोची: बारामती शहरातील शाकंभरीदेवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये देवीचे भजन, अभिषेक, श्रीसूक्त पाठ, दुर्गा सप्तशती पाठवाचन, होमहवन आदी कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत सुरू आहेत.

Shakambhari Devi
Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी मोर्चेबांधणी; मुळशीतून विक्रमी मताधिक्याचा निर्धार

बारामती तालुका देवांग व हटगर कोष्टी समाज यांनी ७ गुंठ्यांत पेशव्यांचे सावकार श्रीमंत बाबूजी नाईक वाड्यासमोर, सद्गुरू मठ शेजारी १९५० च्या दशकात सदर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. मूळ कर्नाटक राज्यातील बदामी येथील देवीचे स्थान आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात शाकंबरी, चौंडेश्वरी, बनशंकरी अशा विविध नावाने ती प्रसिद्ध आहे. तिची विविध ठिकाणी मंदिरे आहेत.

Shakambhari Devi
Smita Jadhav: पुणे पदवीधर निवडणूक: डॉ. स्मिताताई जाधव यांना ३०० हून अधिक कलाकारांचा पाठिंबा

सर्वत्र दुष्काळ होता, खाण्यास अन्न नव्हते तेव्हा देवीने स्वतःच्या शरीरातून भाजीपाला व फळेनिर्मिती केली आणि लोकांना अन्नपुरवठा केला म्हणून शाकंभरी हे नाव पडले, अशी दंतकथा आहे. या देवीची मूर्ती सिंहावर बसलेली असून हातात विविध आयुधे आहेत. गाभारा दगडी बांधकाममध्ये असून इतर कामे सागवानी लाकूड व पत्रा वापरून केला आहे.

Shakambhari Devi
Winter 2026 Exam Centres: हिवाळी सत्र २०२६ परीक्षांसाठी महाविद्यालयांना तात्पुरती केंद्रमान्यता; दोन परीक्षा केंद्रांवर कायमस्वरूपी बंदी

कर्नाटक राज्यातील बदामी येथील प्रथेप्रमाणे बारामतीमध्ये डिसेंबर व जानेवारीमध्ये देवीचा नवरात्र उत्सव असतो. वसंत पंचमीला मंदिर स्थापन झाले म्हणून भंडारा असतो. पालखी सोहळा बारामती शहरातून निघतो. विश्वस्त म्हणून नितीन डोईफोडे, अभिषेक पांडकर, शरद ढवळशंख, सुरेश टेके, नारायण भंडारी मंदिर समितीचे काम पाहतात.

Shakambhari Devi
Pune Free Health Checkup Camp: पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर; ३५० महिलांनी घेतला लाभ

नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. जे भाविक बदामी कर्नाटक येथे जाऊ शकत नाहीत, ते नवरात्र उत्सव व नित्यनेमाने दर्शन करण्यासाठी शाकंभरी मंदिर या ठिकाणी येत असतात.

मंदिर जीर्णोद्धाराचे नियोजन

सध्या मंदिराचे नूतनीकरण करण्याचे नियोजन असून, जीर्णोद्धारासाठी भाविकांनी मदत करावी, असे आवाहन शाकंभरी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news