Pune District Cooperative Bank Election: पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; मतदान प्रतिनिधी निवडले, आता मतांचे गणित

सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग; विविध पक्षांच्या नेत्यांकडून तालुकानिहाय ताकदीची चाचपणी
Pune District Cooperative Bank
Pune District Cooperative BankPudhari
Published on
Updated on

रामदास डोंबे

खोर: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रतिनिधी निवडण्याची रणधुमाळी मंगळवारी संपली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना आता वेग येणार असून, संचालकपदासाठी इच्छुक नेत्यांचा कस आता लागेल. कोणाच्या पारड्यात किती मतदान प्रतिनिधी आले आहेत, त्यावर बँकेच्या निवडणुकीतील गणित नक्की होईल.

Pune District Cooperative Bank
Pune District Rain: पावसाने पुणे जिल्ह्यात पुन्हा हजेरी; खरीप पिकांना दिलासा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

सध्या बॅंक अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहे, ती आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनाही काही ठिकाणी आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत. राजकीय पक्षातील या महत्वकांक्षामुळे जिल्हा बॅंकेची निवडणुक प्रथमच बहुपक्षीय आणि चुरशीची होणार आहे.

Pune District Cooperative Bank
Pune Ganeshotsav Horror Exhibits: पुण्यात गणेशोत्सवात हॉरर देखाव्यांची धूम; चार किलोमीटरपर्यंत रांगा

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची राजकीय व सहकारी क्षेत्रातील परिस्थिती वेगळी आहे. काही तालुक्यांत एकाच राजकीय नेत्याचे सहकारातील सोसायटीमध्ये वर्चस्व असताना, काही ठिकाणी दोन किंवा अधिक गटांमध्ये चुरस निर्माण झाली असल्याने मतदार प्रतिनिधी निवडीतूनच आगामी निवडणुकीतील संभाव्य समीकरणांचा अंदाज घेण्याचा नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे.

Pune District Cooperative Bank
Pune Ganeshotsav Science Exhibitions: मध्य पुण्याच्या गर्दीला पर्याय; उपनगरांत गणेशोत्सवाचे ‘सायन्स’ देखावे ठरतात आकर्षण

जिल्हा बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे. या निवडणुकीत विविध राजकीय गटांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील नेते आणि स्थानिक पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. प्रतिनिधी निवडीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील आपले संघटन किती मजबूत आहे, याची चाचपणीही त्यांनी केली आहे.

Pune District Cooperative Bank
Pune Marathon 2026: पुण्यात सहा महिन्यांत तब्बल २६ मॅरेथॉन; ‘रनिंग कल्चर’ला वेग, पण अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?

‘प्रतिनिधी’ ठरला; आता मतांचे गणित

मतदान प्रतिनिधी ठरले असले तरी खरी कसोटी आगामी निवडणूक प्रक्रियेत लागणार आहे. कोणत्या गटाकडे किती प्रतिनिधी आहेत, कोणत्या तालुक्यात कोणाचे वर्चस्व आहे आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी हे प्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, यावर पुढील राजकीय गणित अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news