Baramati Load Shedding: बारामतीत अतिरिक्त भारनियमनामुळे शेतकरी संतप्त! महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

सलग अतिरिक्त वीज कपातीने ग्रामीण भाग त्रस्त; शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर महावितरणचे आश्वासन
power cut
power cutPudhari
Published on
Updated on

सांगवी: बारामती तालुक्याच्या ग््राामीण भागात सुरू असलेल्या अतिरिक्त भारनियमनामुळे नागरिक आणि शेतकरी मेटाकुटीला आले असून, ग््राामीण भागातून तीव संताप व्यक्त केला जात आहे. नियोजित वेळेपेक्षा सलग तीन तास अतिरिक्त (फोर्स) भारनियमन होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर सांगवी परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. 26) एकत्र येत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भारनियमन बंद करण्यासाठी लेखी निवेदन दिले.

power cut
Pune Census Work: जनगणना कामात हलगर्जीपणा महागात! पुणे महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा

या वेळी बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी भारनियमन कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. सांगवी व बारवनगर वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या भागात दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भारनियमन केले जात आहे. मात्र, सोमवारी (दि. 25) रात्री दहानंतरही वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बारवनगर व सांगवी वीज उपकेंद्रांवर धडक मोर्चा काढला. या वेळी आंदोलकांनी कर्मचाऱ्यांना विविध प्रश्न विचारत जाब विचारला.

power cut
Dimbhe Dam Crop Loss: डिंभे धरणाचे पाणी उशिरा; आंबेगावातील शेतकऱ्यांची पिके जळून खाक

त्यानंतर मंगळवारी सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, भिकोबानगर व खांडज परिसरातील शेतकऱ्यांनी थेट बारामती येथील ऊर्जा भवन गाठून मुख्य अभियंता पेठकर यांना निवेदन दिले. या वेळी शेतीपंप ग््रााहकांचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले तसेच गावठाण फीडर योजना युद्धपातळीवर राबविण्यात येणार असल्याचेही पेठकर यांनी स्पष्ट केले.

power cut
Pune Missing Persons: पुण्यात बेपत्ता नागरिकांचा थरारक आकडा! साडेपाच वर्षांत 3,221 जणांचा अजूनही शोध नाही

ग््राामपंचायतींकडून जनजागृती

भारनियमनाचा ताण कमी करण्यासाठी ग््राामपंचायतींच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळेत जास्त वीज वापरणारी उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन दवंडी देऊन करण्यात येत आहे.

power cut
IAF GATE Recruitment Scheme: भारतीय हवाई दलाची मोठी घोषणा! आता GATE गुणांवर थेट तांत्रिक अधिकारी होण्याची संधी

वीजचोरीविरोधात धाडसत्र सुरू

ग््राामीण भागात वाढत्या वीजचोरीमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कडबाकुट्टी मशिन, धारा काढण्याची यंत्रे, हिटर, सिंगल फेज पंप, कुलर, पंखे आदी उपकरणांमुळे विजेचा वापर वाढत असल्याचे सांगण्यात आले. वीजचोरी रोखण्यासाठी विशेष पथके (स्क्वॉड) तयार करण्यात आली असून, ही पथके कोणत्याही गावात अचानक धाडी टाकणार असल्याची माहिती मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news