Baramati Nira Road Tree Cutting: बारामती-निरा रस्त्यावर झाडांची कत्तल; वारीत वारकऱ्यांना उन्हाचा फटका

रुंदीकरणामुळे सावलीचा अभाव; रखरखत्या उन्हात पायीवारीची चिंता, पर्यावरणावरही परिणाम
Baramati Nira Road Tree Cutting
Baramati Nira Road Tree CuttingPudhari
Published on
Updated on

बारामती: विकासाच्या प्रक्रियेत रस्ते मोठे होणे आता काळाची गरज बनली आहे. बारामती तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून बारामती-निरा रस्ता ओळखला जातो. या रस्त्याचे गेल्या काही वर्षांपासून टप्प्याटप्प्याने रुंदीकरण सुरू आहे. त्यासाठी शेकडो वर्षे जुनी वड, पिंपळ, चिंच यांसारखी हजारो झाडे तोडली गेली आहेत. परिणामी हा रस्ता बकाल बनला आहे. यंदाच्या वारीलाही त्याचा फटका बसणार असून, रखरखत्या वाटेवरून चालणे वारकऱ्यांसाठी जिकीरीचे बनणार आहे.

Baramati Nira Road Tree Cutting
Baramati Bypoll PRO App: बारामती पोटनिवडणुकीत PRO ॲप अनिवार्य; निवडणूक प्रक्रियेत बदल

आषाढी वारीचा सोहळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना, यंदा वारकऱ्यांना रखरखत्या उन्हातच पायीवारी करावी लागणार आहे. बारामती-निरा राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे हजारो झाडांची कत्तल झाल्याने पालखी मार्गावर सावलीचा पूर्णतः अभाव जाणवत आहे.

Baramati Nira Road Tree Cutting
Manchar Fake Gold Scam: मंचरमध्ये बनावट सोन्याच्या आमिषाने फसवणूक; सहा जण अटकेत

दरवर्षी संत सोपानदेव पालखी सोहळा बारामती तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. मात्र, यंदा मार्गावरील झाडांची तोड आणि अपूर्ण कामांमुळे वारकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. हवामान विभागानेही यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने वारकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Baramati Nira Road Tree Cutting
Pune Narhe Robbery: पुण्यात नऱ्हेत कोयत्याच्या धाकाने 4 लाखांची लूट

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जुन्या व मोठ्या सावलीच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली. पूर्वी वड, पिंपळ, जांभूळ, लिंब यांसारखी दाट सावली देणारी झाडे वारकऱ्यांसाठी आधार ठरत होती. या झाडांच्या सावलीत वारकरी विसावा घेत पुढील प्रवासाला निघत असत. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कामांमुळे हा मार्ग आता पूर्णतः उजाड आणि भकास झाला आहे.

Baramati Nira Road Tree Cutting
Pune Voter List Verification: पुण्यात 31 लाख मतदारांची पडताळणी पूर्ण; विशेष मोहिमेला वेग

प्रशासनाकडून वृक्षारोपण करण्यात आले असले, तरी झाडे जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना न झाल्याने अनेक रोपे वाळून गेली आहेत. या मार्गावर पुन्हा दाट सावली निर्माण होण्यासाठी किमान 10 वर्षांचा कालावधी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news