Pune Narhe Robbery: पुण्यात नऱ्हेत कोयत्याच्या धाकाने 4 लाखांची लूट

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घटना; दुचाकीस्वार चोरटे फरार, पोलिसांचा शोध सुरू
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

पुणे: मद्यविक्री दुकानात काम करणाऱ्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चार लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली. ही घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात घडली.

Theft
Pune Voter List Verification: पुण्यात 31 लाख मतदारांची पडताळणी पूर्ण; विशेष मोहिमेला वेग

याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रोहन रवींद्र कांबळे (वय 31, रा. इंदू निवास, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड) याने नऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरटा आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Theft
Pune Bank Misconduct Case: पुण्यात बँकेत गोंधळ; व्यवस्थापकाला धमकी, दोघांविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन एका मद्यविक्री दुकानात कामाला आहे. मद्यविक्री दुकानात जमा झालेली तीन लाख 99 हजार रुपयांची रोकड घेऊन तो 12 एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास मालकांच्या घरी देण्यासाठी निघाला होता.

Theft
Pune Excise Revenue Record: पुणे उत्पादन शुल्क विभागाची विक्रमी कामगिरी; 3605 कोटी महसूल

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात दुचाकीस्वार कांबळे याला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. त्याला कोयत्याचा धाक दाखविला. त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन तीन लाख 99 हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून चोरटे पसार झाले. या घटनेनंतर कांबळेने पोलिसांकडे तक्रार दिली.

Theft
Pune Heatwave April Temperature: पुण्यात उष्णतेची लाट तीव्र; तापमान 42 अंशांवर

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम शेटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी बाह्यवळण मार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलिस उपनिरीक्षक लिटे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news