Baramati Bypoll PRO App: बारामती पोटनिवडणुकीत PRO ॲप अनिवार्य; निवडणूक प्रक्रियेत बदल

मतदानाची माहिती थेट आयोगापर्यंत; साहित्य वितरण पद्धतीतही सुधारणा, पारदर्शकतेवर भर
Baramati Bypoll
Baramati BypollPudhari
Published on
Updated on

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी नोडल अधिकारी व झोनल (क्षेत्रीय) अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक प्रक्रियेतील केलेल्या महत्त्वपूर्ण बदलांबाबत मार्गदर्शन केले.

Baramati Bypoll
Manchar Fake Gold Scam: मंचरमध्ये बनावट सोन्याच्या आमिषाने फसवणूक; सहा जण अटकेत

या वेळी निवडणूक आयोगाने नव्याने अमलात आणलेल्या दोन प्रमुख बदलांवर विशेष भर देण्यात आला. यंदाच्या निवडणुकीत पीआरओ ॲपचा वापर अनिवार्य केला आहे. यामुळे केंद्रावरील मतदानाची अचूक आकडेवारी तत्काळ मिळणे शक्य होणार आहे.

Baramati Bypoll
Pune Narhe Robbery: पुण्यात नऱ्हेत कोयत्याच्या धाकाने 4 लाखांची लूट

यापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष मतदानाची माहिती मोबाईलद्वारे विविध स्तरांमार्फत पोहोचविली जात होती. मात्र, आता केंद्राध्यक्षांनी मतदानासंदर्भातील सर्व माहिती थेट या ॲपद्वारे नोंदवायची आहे. त्यामुळे माहिती प्रसारित होण्याच्या प्रक्रियेत असलेले मधले टप्पे कमी होऊन थेट मतदान केंद्रावरून निवडणूक आयोगापर्यंत माहिती पोहोचणार आहे. तसेच मतदानाची एकूण संख्या व टक्केवारी यांसारखी महत्त्वाची माहिती सर्वसामान्य नागरिकांनाही पाहण्यासाठी उपलब्ध होणार असल्याने पारदर्शकतेत लक्षणीय वाढ होणार आहे.

Baramati Bypoll
Pune Voter List Verification: पुण्यात 31 लाख मतदारांची पडताळणी पूर्ण; विशेष मोहिमेला वेग

यासोबतच निवडणूक साहित्य वितरण प्रक्रियेतही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांना साहित्य घेण्यासाठी ठराविक केंद्रावर उपस्थित राहावे लागत होते. मात्र, नव्या पद्धतीनुसार क्षेत्रीय अधिकारी मतदानाच्या आदल्या दिवशीच संबंधित मतदान केंद्रांवर जाऊन आवश्यक साहित्य कर्मचाऱ्यांना वितरीत करणार आहेत. तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेच अधिकारी संबंधित साहित्य परत गोळा करून आणणार असल्याने कर्मचाऱ्यांचा ताण कमी होऊन वेळेचीही बचत होणार आहे.

Baramati Bypoll
Pune Bank Misconduct Case: पुण्यात बँकेत गोंधळ; व्यवस्थापकाला धमकी, दोघांविरुद्ध गुन्हा

चोकलिंगम यांनी या दोन्ही बदलांचे महत्त्व अधोरेखित करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश दिले. या वेळी निवडणूक निरीक्षक विद्यानंद सिंग, निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे व किशोर माने, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्यासह सर्व नोडल व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news