Baramati NCP Politics: अजितदादांनंतर आठ महिन्यात बारामतीतच पक्षात बंड, निष्ठावंत पुरूषोत्तम जगताप यांचाच राष्ट्रवादीला हादरा

'सुनेत्रा पवारांचा कस लागणार, अजितदादांनंतर राष्ट्रवादी कुठे कमी पडली?'
Sunetra Pawar
Sunetra PawarPudhari
Published on: 
Updated on: 

राजेंद्र गलांडे

बारामती : अजितदादा पवार यांच्या निधनाला आठ महिने पूर्ण होत असतानाच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीतच पक्षात बंड झाले आहे.अजितदादांच्या पश्चात झालेला हे पहिलेच बंड बारामतीची आगामी राजकीय गणित बदलून टाकणारे ठरणार आहे.

बारामतीच्या सहकाराच्या राजकारणात या बंडामुळे मोठा भूकंप झाला. अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनीच वेगळी चूल मांडत स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली. 'सोमेश्वर'ची निवडणूक यामुळे आता केवळ कारखान्याची निवडणूक न राहता अजितदादांनंतर बारामतीच्या सहकारातील बदलत्या राजकीय समीकरणांची पहिली मोठी परीक्षा ठरली आहे.

Sunetra Pawar
Divya Shinde: ‘बिग बॉस’फेम दिव्या शिंदे ‘अँक्झायटी Attack’चे कारण देऊन माहिती लपवतेय, पोलिसांचा दावा

'सोमेश्वर'साठी राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या यादीत पुरुषोत्तम जगताप यांना स्थान दिले होते,परंतु पक्षाची उमेदवारी नाकारत जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केल्याने राष्ट्रवादीलाही त्यांची उमेदवारी मागे घ्यावी लागली. वाणेवाडी येथे झालेल्या मेळाव्यात जगताप यांनी 'लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनेल'च्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका जाहीर केली. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांची साथ या पॅनेलला मिळाल्याने भाजपशीही या घडामोडींचे राजकीय समीकरण जोडले गेले आहे.

अजितदादांनंतर पहिलाच मोठा धक्का!

बारामती तालुक्यात गेल्या अडीच दशकात अजितदादा म्हणतील तेच व्हायचे. त्यांचा मोठा दरारा होता. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर सुद्धा तालुक्यातील सहकारी संस्था अजितदादांकडेच राहिल्या. निवडणूकीत अजितदादांचा शब्द अंतिम मानला जायचा. त्यांच्या निर्णयाविरोधात जाण्याचे कोणाचे धाडस होत नव्हते. माळेगावच्या निवडणूकीत अजितदादांनी प्रचंड ताकद पणाला लावत विरोधकांना भुईसपाट केले होते मात्र त्यांच्या निधनानंतर पहिल्याच मोठ्या सहकारी निवडणुकीत विद्यमान अध्यक्षांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने अजितदादांच्या नंतरच्या नेतृत्वाची राजकीय पकड ढिली होवू लागल्याचे बोलले जावू लागले आहे. अजितदादांच्या नेतृत्वात जगताप यांनी तब्बल ३५ वर्षे संचालक व १३ वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे त्यांचे बंड हे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचे बंड नसून कारखान्याच्या सत्ताकेंद्रातूनच उभे राहिलेले आव्हान मानले जात आहे.

Sunetra Pawar
Khed Taluka Meeting | खेड तालुक्यातील टंचाई आराखडा बैठकीत अधिकारी मोबाईल मध्ये व्यस्त

'अजितदादांनंतर राष्ट्रवादी कुठे कमी पडली?'

या घडामोडींमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चिला जाणारा प्रश्न म्हणजे अजितदादांनंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक संघटनेत नेमकी कुठे कमी पडली? अजितदादांनी त्यांच्या हयातीत अनेकांना सहकारी संस्थांवर संधी दिली. संस्थांना आर्थिक शिस्त लावली. त्यांच्या नेतृत्वातील संस्थांमध्ये संचालकांना डोळ्यात तेल घालूनच काम करावे लागे. परंतु त्यांच्या पश्चात पक्षीय घडी विस्कटल्याचेच समोर आले.

Sunetra Pawar
Someshwar Sugar Factory Election : ‘सोमेश्वर’मध्ये अखेर राष्ट्रवादीत फूट, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे बंड

सुनेत्रा पवारांचा कस लागणार

पुरुषोत्तम जगताप यांनी आता स्वतंत्र पॅनेल करत परतीचे दोर कापल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा. पार्थ पवार, युवा नेते जय पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा निवडणूकीत कस लागणार आहे.अजित पवार यांच्याच अत्यंत विश्वासू असलेल्या जगताप यांनीच साथ सोडल्याने सभासदांचा कल कोठे झुकतो याचे औसुक्य आहे.

Sunetra Pawar
Nilesh Ghaywal Mocca Case: मोक्का प्रकरणात नीलेश घायवळसह सहा आरोपी निर्दोष

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही गडबड

बारामतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करणार असल्याचे सांगितले असताना त्यांच्याच पक्षाचे पुरंदरचे शिलेदार त्यांच्यासोबत राहिले नाहीत.पुरंदर तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे यांनी पुरूषोत्तम जगताप यांना साथ दिली आहे. विशेष म्हणजे, 'माळेगाव'च्या निवडणूकीतही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पॅनेल दिले असताना सभासदांची अपेक्षित साथ युगेंद्र पवार यांना मिळाली नव्हती,तरीही ते स्वतंत्र पॅनेलद्वारे 'सोमेश्वर'च्या मैदानात उतरले आहेत. पुरंदरमधून त्यांचाच पक्ष सोबत नसताना त्यांनी हे धाडस केले आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी सहकारात राजकारण नको अशी भूमिका घेतली असतानाही युगेंद्र यांनी सोमेश्वर विकास पॅनेलची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार त्यांना मदत करतात का याचेही औत्सुक्य आहे. त्यामुळे निवडणूकीतील चुरस अधिकच वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news