Khed Taluka Meeting | खेड तालुक्यातील टंचाई आराखडा बैठकीत अधिकारी मोबाईल मध्ये व्यस्त

बैठकीत उपस्थित अधिकारी मोबाईल फोनवर व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले
Water Scarcity Meeting Khed Pune
बैठकीत उपस्थित अधिकारी मात्र अनेकदा मोबाईल फोनवर व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले.Pudhari
Published on: 
Updated on: 

Water Scarcity Meeting Khed Pune

राजगुरुनगर: दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर खेड तालुक्यात बुधवारी (दि ३०) टंचाई आराखडा बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार बाबाजी काळे तसेच जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती अमोल नलावडे पालक सभापती म्हणून उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित अधिकारी मात्र अनेकदा मोबाईल फोनवर व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तालुक्यात अनेक भागात पाऊस झाला नाही. अनेक गावांत लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे.अशा पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या टंचाई आराखडा बैठकीत अधिकाऱ्यांना मात्र कसलेच गांभीर्य नसल्याचे निदर्शनास आले.

Water Scarcity Meeting Khed Pune
Pune Crime News | एक खून... तीन कहाण्या!

आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य ॲड विजयसिंह शिंदे पाटील, समीर सुपे, सुनीता बुट्टे पाटील, तनुजा घनवट, दिप्ती भोगाडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पंचायत समिती सदस्य, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढील तीन महिन्यांत संभाव्य पाणी टंचाई, पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करणे, बळकटीकरण, दुरुस्ती करणे यावर चर्चा झाली. मुख्यत्वे तालुक्याच्या पश्चिम आणि पुर्व भागातील गाव, वाड्या, वस्त्यांवर ही कामे करण्यात येणार असल्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. पाण्या संदर्भातील कामांमध्ये आमदार बाबाजी काळे आणि सभापती अमोल नलावडे यांनी अधिकाऱ्यांची कोणतीही चालढकल चालणार नाही असे खडसावले. नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Water Scarcity Meeting Khed Pune
Pune New Mutha Right Canal Encroachment: नवीन मुठा उजवा कालव्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई रखडली; मनुष्यबळाचा अभाव

आता तुमचे नाव ' हयातभर ' खेड पंचायत समितीच्या बोर्डावर राहील'

' सभापती होण्यासाठी बरेच काही करावे लागते. पण अनेकदा योग जुळुन येत नाही. तुम्ही पाच दिवसांसाठी पदभार स्वीकारला आता तुमचे नाव ' हयातभर ' खेड पंचायत समितीच्या बोर्डावर राहील' असे आमदार बाबाजी काळे यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यात सभापती अमोल नलावडे यांचाही समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news