Someshwar Sugar Factory Election : ‘सोमेश्वर’मध्ये अखेर राष्ट्रवादीत फूट, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे बंड

राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी नाकारत भाजपसह स्वतंत्र पॅनेलची घोषणा, राष्ट्रवादीकडून शिंदे सेना सोबत : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून यादी जाहीर होणार
Someshwar Sugar Factory Election : ‘सोमेश्वर’मध्ये अखेर राष्ट्रवादीत फूट, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे बंड
Published on: 
Updated on: 

बारामती/सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी (दि. ३०) मोठ्या नाट्यमय घटना घडल्या. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादी (अप) कडून जाहीर झालेली उमेदवारी नाकारत भाजपसोबत स्वतंत्र पॅनेल मैदानात उतरवत बंडाचे निशाण फडकावले. राष्ट्रवादीने शिवसेनेला (शिंदे गट) एक जागा देत सोबत घेतले. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही निवडणूक लढविण्याच्या निर्णय घेतला आहे. लवकरच यादी जाहीर करू असे युगेंद्र पवार म्हणाले.

राष्ट्रवादी भवनामध्ये पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी-शिवसेनेचे यादी जाहीर केली. युवा नेते जय पवार, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, नगराध्यक्ष सचिन सातव, सभापती किरण तावरे यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीने सुरुवातीला जाहीर केलेल्या यादीत पुरुषोत्तम जगताप यांना उमेदवारी दिली होती. पंरतु ते बंडावर ठाम राहिल्याने यादी बदलण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. पुरुषोत्तम जगताप यांनी पत्रकार परिषद घेत स्वतंत्रपणे पॅनेलची घोषणा केली. यावेळी माजी आमदार संजय जगताप, राष्ट्रवादीचे सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे उपस्थित होते.

Someshwar Sugar Factory Election : ‘सोमेश्वर’मध्ये अखेर राष्ट्रवादीत फूट, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे बंड
Pune IT Jobs: पुण्यातील IT क्षेत्रासाठी गुड न्यूज! अमेरिकन कंपन्यांच्या भागीदारीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार

राष्ट्रवादी (अप) च्या श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलचे उमेदवार पुढील प्रमाणे : सर्वसाधारण गट क्र. १ निंबूत-खंडाळा - अभिजित सतीश काकडे (निंबूत), प्रमोद भगवानराव काकडे (निंबूत), डाॅ. वसंतराव रामराव दगडे (निरा-शिवतक्रार), गट क्र. २- मुरुम-वाल्हा - विक्रम आनंदराव भोसले (वाणेवाडी), ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड (करंजेपूल), राजवर्धन शिवाजीराव शिंदे (मुरुम), गट क्र. ३ होळ-मोरगाव- रवींद्र जयवंतराव भापकर (लोणी भापकर), मकरंद चंद्रकांत सस्ते (सस्तेवाडी) व मनिषा आनंदकुमार होळकर (सदोबाचावीड), गट क्र. ४ कोऱहाळे-सुपा - राजेंद्र हरीभाऊ बोरकर (बोरकरवाडी), अक्षय धनंजय खलाटे (माळवाडी-लाटे), सुनील नारायण भगत (कोऱहाळे बुद्रूक), गट क्र. ५ मांडकी-जवळार्जून- सतीश संपत जगताप (मांडकी), सुधाकर ज्ञानोबा टेकवडे (जवळार्जून), उत्तम महादेव धुमाळ (जेऊर), ब वर्ग प्रतिनिधी गट- संग्राम तानाजी सोरटे (सोरटेवाडी), इतर मागास प्रवर्ग- शैलेश पंढरीनाथ रासकर (खंडोबाचीवाडी), भटक्या जाती व विमुक्त जमाती गट- अशोक चंद्रकांत धायगुडे (आंदोरी, ता. खंडाळा), अनुसुचित जाती जमाती गट- द्वारकोजी गुलाब साळवे (वडगाव निंबाळकर), महिला राखीव गट- प्रणिता मनोज खोमणे (कोऱहाळे खुर्द), छबुबाई अंकुश नाझिरकर (नाझरे) यांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत.

राष्ट्रवादी-सेनेकडून आजी-माजी ११ जण पुन्हा रिंगणात

विद्यमान संचालकापैंकी अभिजित काकडे, शैलेश रासकर, ऋषिकेश गायकवाड, राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, सुनील भगत, प्रणिता खोमणे सातजणांना संधी देण्यात आली आहे. तर या मागील संचालक मंडळात असलेल्या प्रमोद काकडे, वसंतराव दगडे, उत्तम धुमाळ, सुधाकर टेकवडे या चौघांना संधी देण्यात आली आहे. मंत्री मकरंद पाटील यांनी सुचवल्यानुसार खंडाळ्यातून अशोक चंद्रकांत धायगुडे यांना संधी देण्यात आली. वसंतराव दगडे यांच्या रुपाने शिवसेना (शिंदे गट) यांना राष्ट्रवादीने सामावून घेतले आहे.

Someshwar Sugar Factory Election : ‘सोमेश्वर’मध्ये अखेर राष्ट्रवादीत फूट, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे बंड
Nilesh Ghaywal Mocca Case: मोक्का प्रकरणात नीलेश घायवळसह सहा आरोपी निर्दोष

पुरुषोत्तम जगताप व भाजप यांच्या लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे -

सर्वसाधारण गट १ निंबूत-खंडाळा- महेश काशिनाथ काकडे (निंबूत), संतोष पोपटराव थोपटे, संभाजी मुगुटराव घाडगे (पिंपरे), गट २ मुरुम-वाल्हा- पुरुषोत्तम रामराजे जगताप (वाणेवाडी), सतीश रामचंद्र सकुंडे (वाघळवाडी), वैभव अशोक गायकवाड (करंजेपूल), गट क्र. ३ होळ-मोरगाव - अमर आनंदराव होळकर (सदोबाचीवाडी), राहूल दत्तात्रय भापकर (लोणी भापकर), संतोष ज्ञानदेव दरेकर (वडगाव निंबाळकर), गट क्र. ४ कोऱहाळे-सुपा - सचिन जवाहर खलाटे (लाटे), गोऱख बाबुराव खोमणे (कोऱहाळे खुर्द), अनिल नारायण जगताप (जळगाव सुपे), गट क्र. ५ - मांडकी-जवळार्जून- विश्वास लक्ष्मण जगताप (मांडकी), शामराव तुकाराम धुमाळ (जेऊर), अरविंद शिवाजी शेंडकर (पिंपरी), इतर मागास प्रवर्ग- नीलेश हरीभाऊ केदारी (मोरगाव), इतर मागास प्रवर्ग- धनंजय बाबुराव गडदरे (गडदरवाडी), महिला राखीव- मंजिरी दिपक निगडे (गुळुंचे), वंदना संभाजी गरुड (बेलसर), अनुसुचित जाती जमाती गट - मिलिं बळवंत कांबळे (होळ) ब वर्ग गट - महेश महादेव राणे (जवळार्जून)

लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलकडून सहा आजी-माजी मैदानात

लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनेलने उमेदवारी देताना विद्यमान अध्यक्ष व संचालक पुरुषोत्तम जगताप, विश्वास जगताप, मिलिंद कांबळे या तिघांना तर महेश काकडे व सचिन खलाटे, महेश राणे या माजी संचालकांनाही संधी दिली आहे. उर्वरित १५ जागी नवीन चेहरे दिले आहेत.

Someshwar Sugar Factory Election : ‘सोमेश्वर’मध्ये अखेर राष्ट्रवादीत फूट, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे बंड
Purandar Land Deal: पुरंदरमध्ये जमीन व्यवहारांना ‘गोल्ड रश’; बनावट मालक उभा करून १.७९ कोटींचा व्यवहार?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यादी जाहीर करणार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनही सोमेश्वरची निवडणूक सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलद्वारे लढविली जाणार असल्याची माहिती पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिली. आम्ही सर्व २१ जागा लढविणार असून लवकरच पॅनेल जाहीर करू असे युगेंद्र यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

logo
Pudhari News
pudhari.news