Baramati Crime: बारामतीत अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

मुलाच्या आत्महत्येचा राग मनात धरून मुलीला त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप; दोघांविरोधात गुन्हा नोंद
minor girl assault
minor girl assault file photo
Published on
Updated on

बारामती: मुलाने आत्महत्या केल्याचा राग मनात धरून त्यासाठी एका अल्पवयीन मुलीला जबाबदार धरत तिला त्रास दिला. यातून त्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

minor girl assault
Pune Jilha Parishad Members Selection: पुणे जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य निवडीकडे लक्ष; राजकीय समीकरणांवर परिणामाची शक्यता

किशोर धनाजी मोरे व शुभांगी ईश्वर मोरे (रा. बऱ्हाणपूर, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी (दि. 18) सायंकाळी शहरातील जळोची परिसरात एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. आत्महत्या केलेल्या 16 वर्षीय मुलीच्या आईने याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

minor girl assault
Cooperative Banks CSR India: सहकारी बँकांसाठी ‘सीएसआर’ संकल्पना लागू करण्याची मागणी

मोरे यांच्या मुलाने आत्महत्या केली होती. त्याचा राग मनात धरून त्यासाठी अल्पवयीन मुलीला जबाबदार ठरवत तिला त्रास दिला गेला. त्यातून ती मानसिकदृष्ट्‌‍या खचल्याने तिने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी मुलीचे वडील व भाऊ तिच्या मामाच्या गावी एका कार्यक्रमासाठी गेले होते.

minor girl assault
Pune Theatre Canteen: पुण्यातील नाट्यगृहांना कॅन्टीनची सुविधा; कलाकार-रसिकांच्या संवादाला नवे व्यासपीठ

तिची आई व ती दोघीच घरी होत्या. परंतु, मुलगी तणावात असल्याने काही बोलत नव्हती. दरम्यान, तिची आई व ती टेरेसवर उन्हाळी वाळवणाची कामे करत होत्या. काही वेळाने मुलगी तेथून खाली घरामध्ये आली. काही वेळाने आई घरी आली असता मुलीने सेफ्टी दरवाजा लावून घेतल्याचे दिसून आले.

minor girl assault
Deposit Insurance Cooperative Societies: पतसंस्था ठेवींना विमा संरक्षणासाठी हालचाली; सहकार आयुक्तालयाकडून ईओआय मागवले

अनेकदा आवाज देऊनही तिने कडी काढली नाही. त्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने खिडकीची काच तोडून लाकडाच्या मदतीने दरवाजाची कडी काढण्यात आली. आतमध्ये जात पाहणी केली असता बेडरूमध्ये या मुलीने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news