Baramati Corporator Resignation Demand: बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांच्या अडचणी वाढल्या; राष्ट्रवादीचा राजीनाम्याचा इशारा

कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून पक्षाची कठोर भूमिका; राजीनामा न दिल्यास हकालपट्टीची चेतावणी
Resignation
ResignationPudhari
Published on
Updated on

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूबद्दल अत्यंत संवेदनाहिन व बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी अडचणीत आलेला येथील नगरसेवक किशोर मासाळ याच्या अडचणी वाढल्या आहेत. आधी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याचे अजित पवार यांच्याबद्दल केलेले बेताल काॅल रेकाॅर्डींग समोर आले. पक्षाने यासंबंधी आता कठोर भूमिका घेतली आहे. मासाळ याने नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा पक्षातून हकालपट्टी करू, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण इंगळे व तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी दिला.

Resignation
Pune Subway Shops: पौड रोड भुयारी मार्गातील दुकाने अनेक वर्षांपासून बंद; महापालिकेचा लाखोंचा महसूल बुडतोय

शहर राष्ट्रवादी भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत इंगळे व बांदल यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मासाळ याच्यावर नुकताच विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विषयी त्याने केलेले बेताल वक्तव्य नुकतेच समोर आले. त्यानंतर बारामतीत संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने आपली भूमिका जाहीर केली. इंगळे म्हणाले, बारामतीकरांच्या भावना तुम्हाला माहिती आहेत, अशा वेळी पक्षाध्यक्ष म्हणून जे करणे अपेक्षित आहे, ते करा, असा सूचना आल्या आहेत. मासाळ यांनी अजितदादांचा एकेरी उल्लेख करत संतापजनक वक्तव्य केले आहे.

Resignation
Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाला गती; ३२ टक्के काम पूर्ण, वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार

त्याचा राजीनामा झाला पाहिजे यासाठी गेली दोन-तीन दिवस आम्ही संपर्क साधत होतो. शुक्रवारी मध्यस्थामार्फत भेट झाली. राजीनामा दे अशी पक्षाची भूमिका आम्ही त्यांना स्पष्ट सागितली. विचार करण्यासाठी वेळ हवा असे सांगत वेळकाढूपणा केला जात आहे. परंतु आम्हाला त्यांना वेळ द्यायचा नाही. नगरसेवकाच्या राजीनाम्याबाबत काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करावी लागते. ती कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल. मासाळ यांचे दादांवर प्रेम असेल, त्यांनी नशेत हा प्रकार केला असेल तर राजीनामा देवून भूमिका मांडायला पाहिजे होती. परंतु तसे घडले नाही. शिवाय रेकाॅर्डींगमधील आवाज त्यांचाच असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता पक्ष म्हणून आम्ही जे काही करायचे ते करत आहोत.

Resignation
Pune Water Tanker Expenditure: पुण्यात पाणीटंचाईवर टँकरद्वारे कोट्यवधींचा खर्च; फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरात समस्या कायम

बारामतीकरांचे अजितदादांवर प्रेम आहे, पक्षातलाच नगरसेवक बेताल वक्तव्य करतो, त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही जनभावना चुकीची नाही, त्यामुळे मासाळ यांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर त्यांना पक्षात ठेवायचे की हकालपट्टी करायची यासंबंधीची प्रक्रिया होईल. सध्या मासाळ राजीनामा देण्यास टाळाटाळ करत आहे. राजीनामा दिला नाही तर कायदेशीर आयुधांचा वापर पक्षाकडून आम्ही करू. हकालपट्टीचा पर्याय वापरू असेही इंगळे व बांदल यांनी स्पष्ट केले.

Resignation
Mulshi Pattern 2: ‘मुळशी पॅटर्न-२’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; प्रवीण तरडेंच्या नव्या चित्रपटाची घोषणा

अजितदादांबद्दल नगरसेवक मासाळ यांनी केलेले वक्तव्य म्हणजे लोकभावनेचा जनक्षोभ आहे. या परिस्थितीत सोमवारी (दि. ८) अजितदादा प्रेमींनी बारामती बंदचे आवाहन केले आहे. सध्या मासाळ राजीनामा देण्यास टाळाटाळ करत आहे. राजीनामा दिला नाही तर कायदेशीर आयुधांचा वापर पक्षाकडून आम्ही करू. दोन दिवसात हकालपट्टीचा पर्याय वापरू असेही इंगळे व बांदल यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news