Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाला गती; ३२ टक्के काम पूर्ण, वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार

एमएसआरडीसीकडून कामाला वेग; २०२७-२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
Pune Ring Road Project
Pune Ring Road ProjectPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या बहुप्रतीक्षित रिंगरोड प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, आत्तापर्यंत ३२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

Pune Ring Road Project
Pune Water Tanker Expenditure: पुण्यात पाणीटंचाईवर टँकरद्वारे कोट्यवधींचा खर्च; फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरात समस्या कायम

महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यासोबतच प्रमुख राष्ट्रीय महामार्गांदरम्यान थेट संपर्कही निर्माण होणार आहे.

Pune Ring Road Project
Mulshi Pattern 2: ‘मुळशी पॅटर्न-२’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; प्रवीण तरडेंच्या नव्या चित्रपटाची घोषणा

एमएसआरडीसीने प्रकल्पाच्या कामावर नियमित देखरेख ठेवली असून, उर्वरित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम टप्प्याचे काम २०२७ पर्यंत, तर पूर्व टप्प्याचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Pune Ring Road Project
Paint Raw Material Price Rise: युद्धाचा फटका रंगउद्योगाला; कच्च्या मालाच्या किमतीत १०० टक्क्यांहून अधिक वाढ

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यासह शहरातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

Pune Ring Road Project
Pune Crime: पुण्यात वारजे लॉजवर छापा; अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका, महिला एजंटला अटक

पुणे रिंगरोड हा राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असून, त्याच्या कामात गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. रिंगरोडच्या प्रत्येक टप्प्यात दर्जेदार बांधकामाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन कामाला अधिक गती देण्यात आली आहे. विविध पॅकेजमध्ये यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ वाढवून नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news