Pune Bank Misconduct Case: पुण्यात बँकेत गोंधळ; व्यवस्थापकाला धमकी, दोघांविरुद्ध गुन्हा

भवानी पेठेत घटना; कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की, पोलिस तपास सुरू
Bank
BankPudhari
Published on
Updated on

पुणे: बँकेत गोंधळ घालून कर्मचारी, तसेच व्यवस्थापकाला शिवीगाळ केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Bank
Pune Excise Revenue Record: पुणे उत्पादन शुल्क विभागाची विक्रमी कामगिरी; 3605 कोटी महसूल

राहुल राजू वाघरेशा (वय 28), राजू वाघरेशा (वय 58, दोघे रा. गोमराज व्हिला, गुलटेकडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बँक व्यवस्थापक श्रीआंश श्रीदेव सिंग (वय 39, रा. रॉयल एनरिच सोसायटी, भोसले गार्डन, हडपसर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भवानी पेठेतील कल्पतरू प्लाझा येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत व्यवस्थापक आहेत. आरोपी सोमवारी (दि. 13 एप्रिल) दुपारी दीडच्या सुमारास बँकेत आले. बँकेतील कर्मचाऱ्यांना त्यांना शिवीगाळ केली.

Bank
Pune Heatwave April Temperature: पुण्यात उष्णतेची लाट तीव्र; तापमान 42 अंशांवर

सिंग यांनी या घटनेची माहिती बँकेतील सुरक्षारक्षक सोमनाथ जगताप यांना दिली. आरोपींनी सुरक्षारक्षक जगताप यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे सिंग यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news