Baramati Businessman Crime
बारामती : लग्नाचे व नोकरीचे आमिष दाखवत एका 27 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी बारामतीतील उद्योजक मनोज कुंडलिक तुपे (रा. ग्रीन पार्क सोसायटी, विद्या प्रतिष्ठानजवळ, बारामती) याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने याबाबत फिर्याद दिली. ऑगस्ट 2021 ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पुण्यातील गाडीतळ, हडपसर, शिवाजीनगर, विमाननगर, चंदननगर, मगरपट्टा आदी भागांतील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ही घटना घडली आहे.(Latest Pune News)
पीडित महिलेने बारामतीत 2020 मध्ये शिक्षण पूर्ण केले. पुढे 2021 मध्ये ती बारामतीतच एमपीएससीचा अभ्यास करीत होती. मे 2021 मध्ये ती पुण्यात राहण्यास गेली. जानेवारी 2021 मध्ये ती बारामतीत मैत्रिणीसोबत एका हॉटेलात जेवणासाठी गेली असताना त्यांची तुपे यांच्याशी ओळख झाली. मी मोठा बिझनेसमन आहे, तुला व तुझ्या मैत्रिणीला नोकरी देतो असे सांगत त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर काही दिवस फोनवर बोलून नोकरीचे आश्वासन दिले. ती पुण्यात राहण्यास गेल्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये तुपे याने तिला कॉल करत जेवणासाठी बोलावले.
त्यांनी एकत्र जेवण केल्यानंतर रात्री मी बारामतीला निघालो आहे, माझ्यासोबत हडपसरपर्यंत चल, तेथून तुला पुन्हा गाडीत घरी पाठवतो असे त्याने महिलेला सांगितले. फिर्यादी त्याच्यासोबत येत असताना साधना शाळेजवळील एका वर्दळ नसलेल्या ठिकाणी मोटार थांबवत त्याने तिच्याशी इच्छा नसताना मोटारीतच संबंध ठेवले. त्यानंतर गाडीतळ येथे आणून तेथून रिक्षा करून दिली. त्यानंतर तो फिर्यादीशी फोनद्वारे बोलत होता. लवकरच लग्न करू असे आश्वासन देत होता. पुण्यातील वेगवेगळ्या हॉटेल्स आणि मोटारीत कामाचे आमिष दाखवून तो शरीरसंबंध ठेवत होता.
ऑक्टोबर 2022 मध्ये फिर्यादीचा विवाह झाला. परंतु ऑगस्ट 2023 मध्ये ती विभक्त झाली. त्यावेळी ती वेगळी राहू लागली. त्यावेळी तुपे याने फोन करत संपर्क तोडू नकोस, आपण लग्न करून सोबत राहू असे आश्वासन दिले. पुढे वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. लग्नापूर्वी हरिद्वारला जाणे शुभ मानले जाते, असे सांगत ऑक्टोबर 2023 मध्ये तिला तिकडे नेले. दोन-दिवस तिकडे राहून हे दोघे परतले. जुलै 2025 पर्यंत लग्न करू असे आश्वासन तुपे देत होता. परंतु त्यानंतर लग्नाचा विषय काढला की भांडण करू लागला. फिर्यादीने लग्न करणार की नाही अखेरचे सांगा, अशी मागणी केल्यावर माझे समाजात नाव आहे, मला लग्न करता येणार नाही. माझ्याकडे तुझे फोटो, व्हीडीओ आहेत ते व्हायरल करेन अशी धमकी देत त्यानंतरही 29 सप्टेंबर व 15 ऑक्टोबर रोजी शरीरसंबंध ठेवले. गरोदर राहू नये, यासाठी वेगवेगळ्या गोळ्या खायला दिल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.