Bangalore Drug Factory Bust: 56 कोटींच्या ड्रग्ज कारखान्यांचा भांडाफोड; गृहमंत्री संतप्त, तिघा पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन

महाराष्ट्र एएनटीएफच्या कारवाईनंतर बंगळुरूत खळबळ; वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती
Bangalore Drug Factory Bust
Bangalore Drug Factory BustPudhari
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्राच्या अमलीपदार्थविरोधी टास्क फोर्सच्या (एएनटीएफ) पथकाने कर्नाटकातील बंगळुरूत ड्रग्जनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर केलेल्या कारवाईचे तीव्र पडसात बंगळुरूमध्ये उमटले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत तेथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली आहे, तर पोलिस आयुक्त सीमांतकुमार सिंह यांनी कोथनूर, बागलूर आणि अवलाहळ्ळी पोलिस ठाण्यातील निरीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती आहे.

Bangalore Drug Factory Bust
Ayodhya Ram Mandir Yatra: २ हजार पुणेकरांची एकत्रित अयोध्या यात्रा; अखिल म्हसोबा ट्रस्टचा भक्तीपूर्ण उपक्रम

'महाराष्ट्र एएनटीएफ'च्या पथकाने या कारवाईत तब्बल 55 कोटी 88 लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त करून हे अमलीपदार्थ तयार करणारे तीन कारखाने नष्ट केले होते. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे ड्रग्जमाफियांनी शहरातील लोकवस्तीत एमडी ड्रग तयार करण्याचे कारखाने थाटले होते. येथे तयार केलेले ड्रग्ज देशातील अनेक शहरांत वितरीत केले जात होते. त्यातून आरोपींनी शहरात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. आतापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक केली आहे. त्यांचे दोघे साथीदार फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद, महाराष्ट्र अमलीपदार्थविरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली होती.

Bangalore Drug Factory Bust
Khadakwasla Deer Hunting: दुर्मिळ चौसिंगा हरणाची शिकार करणाऱ्या चौघांना शनिवारपर्यंत वनकोठडी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी बंगळुरू पोलिस आयुक्तालयात सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अमलीपदार्थांच्या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. म्हैसूरमध्ये यापूर्वी सिंथेटिक ड्रग्जचा कारखाना उघडकीस आला होता. त्या पार्श्वभूमीवर कडक निर्देश देण्यात आले होते. तरीही बंगळुरूमध्ये अमलीपदार्थ निर्मितीचे कारखाने असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या कारवाईतून समोर येणे अत्‍यंत लाजीरवाणे आहे. यामुळे राज्य पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्नाटक पोलिसांकडे गुप्तचर विभाग, तसेच अमलीपदार्थविरोधी पथके कार्यरत असताना, स्वतंत्र पथके याबाबत काम करत असताना देखील त्यांना ड्रग्जनिर्मिती आणि तस्करीचे जाळे उघडकीस न येणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, तर दुसरीकडे ड्रग्जनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांबाबत गंभीर निष्काळजीपणा आढळून आल्याने तीन पोलिस निरीक्षकांना पोलिस आयुक्त सीमांतकुमार सिंह यांनी निलंबित केले आहे.

Bangalore Drug Factory Bust
Land Acquisition Bribery: निकालाची प्रत देण्यासाठी एक लाखांची लाच; भूसंपादन कार्यालयातील महिला अधिकारी एसीबीच्या ताब्यात

महाराष्ट्र शासनाने अमलीपदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण, यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींवर प्रभावी कारवाई करण्याच्या उद्देशाने अमलीपदार्थविरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्यची स्थापना केलेली आहे. सध्या महाराष्ट्रात 7 ठिकाणी विभागीय कृती कार्यालये स्थापन झालेली असून, अमलीपदार्थ तस्करीविरोधी पथकांनी कारवाईस सुरुवात केली आहे.

Bangalore Drug Factory Bust
Bhosari fake liquor factory: घरातच थाटला मद्यनिर्मितीचा कारखाना; भोसरीत एक्साईजचा मोठा छापा

अशी झाली होती कारवाई

- अमलीपदार्थविरोधी टास्क फोर्स महाराष्ट्रच्या कोकण पथकाने 21 डिसेंबर रोजी नवी मुंबई-वाशी गावातील पुणे-मुंबई महामार्गाजवळ जुना बसथांबा येथे अब्दुल कादर रशीद शेख याला पकडले.

- त्याच्याकडून 1 कोटी 48 लाख 80 हजार रुपये किमतीचे 1 किलो 488 ग्रॅम एमडी जप्त केले. वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

- तपासात गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे समोर. अब्दुल कादरची सखोल चौकशी केल्यावर बेळगाव येथे राहणारा व एमडी ड्रग तयार करणारा प्रशांत यल्लापा पाटील याचे नाव निष्पन्न झाले. त्याला पथकाने पकडले. चौकशीतून एमडी ड्रग बंगळुरू येथील तीन कारखान्यांत तयार केले जात असल्याचे पुढे आले.

Bangalore Drug Factory Bust
Maharashtra Scholarship Exam: इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू

- पथकाने थेट बंगळुरू गाठून राजस्थानात कायमचे वास्तव्य असणारे; परंतु बंगळुरू शहरात एमडी ड्रगचा अवैध व्यवसाय करणारे सूरज रमेश यादव व मालखान रामलाल बिष्णोई या दोघांना ताब्यात घेतले.

- त्यांनी गुन्ह्याची कबुली देत बंगळुरूतील स्पंदना लेआउट कॉलनी, एनजी गोलाहळी भागात आर. जे. इव्हेंट नावाची फॅक्टरी तसेच येरपनाहळ्ळी कन्नूर येथील लोकवस्तीतील एका आरसीसी घरात एमडी ड्रग तयार करण्याचे कारखाने दाखविले.

- या तिन्ही ठिकाणी पथकाने छापा टाकून 4 किलो 100 ग्रॅम एमडी तसेच द्रवस्वरूपातील 17 किलो एमडी, असे एकूण 21 किलो 400 ग्रॅम एमडी, एमडी तयार करण्याची यंत्रसामग्री आणि विविध रसायने, असा एकूण 55 कोटी 88 लाख 90 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून या तिन्ही ठिकाणांचे एमडी ड्रगचे कारखाने नष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news