Balewadi Kaspatеwadi Bridge: बालेवाडी-कस्पटेवाडी पूल १४ वर्षांपासून वापराविना; दसऱ्याला पूजा करून महापालिकेचा निषेध

कोट्यवधींचा खर्च करूनही पूल बंद; शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याचा आंदोलकांचा आरोप, परिसरातील गैरप्रकारांवरही चिंता
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

बाणेर: बालेवाडीमधील पुणे महानगरपालिका हद्दीतून पिंपरी-चिंचवड हद्दीतील कस्पटेवाडीला जोडणाऱ्या पुलाचा वापर गेल्या १४ वर्षांपासून होत नसल्याच्या निषेधार्थ दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वाभिमानी पक्षाच्या वतीने पुलाची पूजा करून पुणे महानगरपालिकेचा जाहीर निषेध करण्यात आला. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Pune Municipal Corporation
Pune Ketamine Therapy: ससून रुग्णालयात केटामाईन थेरपी सुरू; आत्महत्येचे तीव्र विचार कमी करण्यासाठी उपचारांचा पर्याय

या पुलाच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र, विकास आराखड्यात (डीपी प्लॅन) बदल करून रस्त्याचा मार्ग बदलण्यात आल्याने हा पूल वापराविना पडून असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा बदल केल्याचेही त्यांनी सांगितले.

Pune Municipal Corporation
Maharashtra Land Measurement: जमिनींच्या मोजणीत अडथळा! सर्व्हे ऑफ इंडियाची GPS यंत्रणा बंद; राज्यातील अनेक प्रकरणे रखडली

पुलाच्या उभारणीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना अद्याप कोणत्याही स्वरूपात मोबदला मिळालेला नसल्याचा दावा करत या प्रश्नावर प्रशासनाकडून तोडगा काढला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

Pune Municipal Corporation
Pune Water Supply: कात्रजकरांना पाण्यासाठी वणवण! पूर्वसूचना न देता पाणी बंद; सलग दोन ते तीन दिवस नागरिकांची गैरसोय

या आंदोलनावेळी हनुमंत बालवडकर, लक्ष्मण पाडळे, अशोकतात्या बालवडकर, आनंद कांबळे (पोलिस पाटील), संदीप बालवडकर, नरेंद्र बालवडकर, चंद्रशेखर बालवडकर यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Pune Municipal Corporation
Pune Jaica Project: पुण्यात जायका प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; चिखलात मलवाहिन्यांची जोडणी, ठेकेदाराला नोटीस

पुलाचा गैरवापर; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

पुलाचा वापर होत नसल्याने परिसरात राडारोडा टाकणे, वाहनांचे पार्किंग करणे, मद्यपानासाठी जागेचा वापर, जुगाराचे अड्डे आणि इतर अनैतिक प्रकार घडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news