Pune Water Supply: कात्रजकरांना पाण्यासाठी वणवण! पूर्वसूचना न देता पाणी बंद; सलग दोन ते तीन दिवस नागरिकांची गैरसोय

आठवड्याच्या पाणीकपातीत रस्त्यांच्या कामांची भर; वडगाव जलकेंद्रातून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: आधीच आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, त्यात रस्त्याच्या कामांमुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि आता कोणतीही पूर्वसूचना न देता गुरुवारी पाणी बंद! अशा तिहेरी कोंडीत कात्रज परिसरातील नागरिक सापडले आहेत. मंगळवार आणि बुधवारीच पाणी न मिळालेल्या भागांतील नागरिकांना गुरुवारच्या अतिरिक्त पाणीबंदमुळे सलग दोन ते तीन दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागली.

Water Supply
Pune Jaica Project: पुण्यात जायका प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; चिखलात मलवाहिन्यांची जोडणी, ठेकेदाराला नोटीस

वडगाव जलकेंद्रातून सिंहगड रस्ता, कात्रज, आंबेगाव, अप्पर इंदिरानगर, सुखसागरनगर आणि कोंढवा परिसराला पाणीपुरवठा होतो. जलकेंद्राची क्षमता आणि वाढती मागणी यांतील तफावत तसेच चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील अपूर्ण टाक्यांमुळे या भागांत रोटेशननुसार आठवड्यातून एकदा पाणी बंद ठेवले जाते.

Water Supply
Khed Illegal Mining: खेडमध्ये उत्खनन माफियांचा महसूल पथकावर हल्ला; हायवातून मुरूम ओतून रस्ता अडवला

मात्र, संपूर्ण परिसरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले असतानाही गुरुवारी पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचीही संधी मिळाली नाही. त्यातच कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरण कामांमुळे जलवाहिन्या वारंवार बाधित होत आहेत. परिणामी, कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.

Water Supply
Gargi Jadhav Treatment Fund: वाघोलीच्या चिमुकल्या गार्गीसाठी माणुसकी धावली; उपचारांसाठी १० कोटींचा निधी जमा

शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद असल्याने वडगाव जल केंद्रातून निघणार्‍या वाहिनीवर फ्लो मीटर बसवण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या परिसरात पूर्वीच्याच रोटेशननुसार आठवड्यातून एकदा पाणी बंद ठेवण्यात येणार असून, गुरुवारी पाणीपुरवठा सुरूच राहील.

नंदकुमार जगताप, प्रमुख पाणीपुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news