Bajaj Pune Grand Tour 2026: बजाज पुणे ग्रँड टूर 2026: ‘मुळशी–मावळ माईल्स’ टप्प्यात ल्यूक मडग्वेचा विजय

87.2 किमीच्या खडतर पहिल्या टप्प्यात न्यूझीलंडच्या ल्यूक मडग्वेने आंतरराष्ट्रीय स्पर्धकांवर मात केली
Luke Mudgway Winner
Luke Mudgway WinnerPudhari
Published on
Updated on

पुणे: ‌‘बजाज पुणे ग््राँड टूर 2026‌’ या सायकलिंग स्पर्धेच्या पहिला टप्पात अर्थात ‌‘मुळशी-मावळ माईल्स‌’मध्ये मंगळवारी चीनच्या ‌‘ली निंग स्टार‌’ संघाचा ल्यूक मडग्वे (न्यूझीलंडचा रायडर) विजेता ठरला. त्याने 2 तास 00.21 सेकंदांत 87.2 किलोमीटरचे अंतर पार करून बाजी मारली.

Luke Mudgway Winner
Bajaj Pune Grand Tour 2026: ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ टप्पा क्रमांक दोनसाठी प्रशासन सज्ज

या स्पर्धेत 87.2 किलोमीटरच्या या आव्हानात्मक मार्गावर गवताळ प्रदेश, वळणदार डोंगराळ रस्ते आणि धरणाचे विलोभनीय बॅकवॉटर अशा निसर्गरम्य; पण खडतर प्रवासातून सायकलपटूंनी आपला मार्ग काढला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या पहिल्या टप्प्यात ल्यूकला विजयासाठी मोठी झुंज द्यावी लागली.

Luke Mudgway Winner
Pune Ward 26 Election Result: प्रभाग 26 मध्ये भाजपचा विजयरथ रोखला; राष्ट्रवादीचे गणेश कल्याणकर विजयी

एस्टोनियाच्या ‌‘क्विक प्रो‌’ संघाचा अँड्रियास मटिल्डास (02 तास 00:27 सेकंद) दुसऱ्या स्थानी, तर बेल्जियमच्या ‌‘टार्टलेटो-आयसोरेक्स‌’ संघाचा योर्बेन लॉरिसेन (02 तास 00:30 सेकंद) तिसऱ्या स्थानी राहिला. ‌‘युनियन सायकलिंग इंटरनॅशनल‌’च्या नियमांनुसार, पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 10, 6 आणि 4 सेकंदांचा ‌‘टाइम बोनस‌’ देण्यात आला. जो पुढील टप्प्यांमध्ये निर्णायक ठरू शकतो.

Luke Mudgway Winner
Mula Mutha Riverfront Development: मुळा-मुठा नदीकाठ विकासाला गती; संगमवाडीतील संरक्षण विभागाची जागा महापालिकेकडे

विजयानंतर बोलताना ल्यूक म्हणाला, ‌‘सुरुवातीपासूनच शर्यत खूप वेगवान होती. पहिल्या चढणानंतर मुख्य जथ्था विभागला गेला. माझ्या दोन सहकाऱ्यांनी मला खूप मदत केली आणि संघासाठी हा विजय मिळवून देताना मला खूप आनंद होत आहे.‌’ तांत्रिकदृष्ट्या अवघड असलेल्या वळणदार उतारावर मिळालेल्या आघाडीमुळे विजय सुकर झाला.

Luke Mudgway Winner
Pune Municipal Scholarship Income Limit: महापालिकेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला उत्पन्न मर्यादा

इतर मानकरी

  • फ्रान्सच्या किलियन लार्पेने पहिल्या चेकपॉइंटवर बाजी मारली. मात्र, सर्व चढणांवर सातत्य राखणारा क्रिस्टियन राईलानू (ली निंग स्टार) पाच गुणांसह ‌‘पोल्का डॉट‌’ जर्सीचा मानकरी ठरला.

  • स्पेनच्या बुर्गोस बुर्पलेट बीएच संघाचा जाम्बालजाम्त सायबायर याने ‌‘ऑरेंज जर्सी‌’ पटकावली.

  • नेदरलँड्‌‍सच्या विलरप्लोएग ग््रूाट ॲमस्टरडॅम संघाचा तामार स्पिएरो याला ‌‘व्हाईट जर्सी‌’ मिळाली.

  • भारतीय राष्ट्रीय संघाच्या हर्षवीरसिंग सेखाँ याने ‌‘ब्लू जर्सी‌’वर नाव कोरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news