Bajaj Pune Grand Tour 2026: ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ टप्पा क्रमांक दोनसाठी प्रशासन सज्ज

कॅम्प ते सिंहगड रोड नांदेड सिटी असा 109 किलोमीटरचा भव्य सायकल मार्ग
Bajaj Pune Grand Tour 2026
Bajaj Pune Grand Tour 2026Pudhari
Published on
Updated on

पुणे: ‌‘बजाज पुणे ग््राँड टूर2026‌’ अंतर्गत टप्पा क्रमांक दोनच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली असून, हा टप्पा बुधवारी (दि. 21) दुपारी 1 वाजून 30 वाजता लेडिज क्लब, कॅम्प येथून सुरू होणार असून, नांदेड सिटी, सिंहगड रोड येथे समारोप होणार आहे.

Bajaj Pune Grand Tour 2026
Pune Ward 26 Election Result: प्रभाग 26 मध्ये भाजपचा विजयरथ रोखला; राष्ट्रवादीचे गणेश कल्याणकर विजयी

या टप्प्यात पुणे शहर, पुरंदर आणि राजगड आणि हवेली या तालुक्यांतून ही रेस जाणार आहे. ही स्पर्धा एकूण 109.15 किलोमीटरची आहे. ही स्पर्धा फक्त महाराष्ट्राची नव्हे, तर देशाची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा इतिहास पुढे येणार असून, एक नवीन इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनासोबत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Bajaj Pune Grand Tour 2026
Mula Mutha Riverfront Development: मुळा-मुठा नदीकाठ विकासाला गती; संगमवाडीतील संरक्षण विभागाची जागा महापालिकेकडे

...असा असेल स्पर्धेचा मार्ग

लेडिज क्लब, कॅम्प येथून प्रारंभ होऊन गोळीबार चौक, कोंढवा, येवलेवाडी, भिवरी, चांबळी, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, केतकावळे, कापूरहोळ, कासुर्डी, मोहरी, जांबळी, आंबवणे, करंजावणे, वांगणी, निघडे, कुसगाव, शिवापूर, कोंढणपूर, सिंहगड घाट रोड, डोणजे, किरकिटवाडी, खडकवासला आणि नांदेड सिटी सिंहगड रोड येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news