पुढारी ऑनलाईन डेस्क
बजाज ऑटोने जगातील पहिली सीएनजी मोटारसायकल-फ्रीडम १२५ सीसी (CNG motorcycle-Freedom 125) लाँच केली आहे. याची किंमत ९५ हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम, भारत) सुरु होते. ही मोटारसायकल तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. त्यात बजाज फ्रीडम १२५ ही एक पेट्रोल आणि दुसरी CNG साठी अशी ट्विन-टँक सेटअपसह सुसज्ज आहे. केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर सीएनजीवर चालणारी ही पहिली मोटरसायकल आहे.
बजाज ऑटोची जगातील पहिली सीएनजी बाईक Freedom 125 लाँच
या बाईकमध्ये एक पेट्रोल आणि CNG साठी असे ट्विन-टँक आहेत.
फ्रीडम १२५ तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध.
सीटखाली ठेवण्यात आली आहे सीएनजी टाकी.
पेट्रोल आणि सीएनजीसाठी दोन स्वतंत्र स्विचेस आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्या हस्ते पुण्यात ही सीएनजी बाइक लाँच करण्यात आली. या नवीन मॉडेलमध्ये लवचिक इंधन पर्याय उपलब्ध आहे. ज्यात पेट्रोल तसेच CNG साठी दोन स्वतंत्र स्विचेस आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
बजाज फ्रीडम १२५ मध्ये १२५ सीसी सिंगल-सिलिंडर इंजिन असेल. जे पेट्रोल आणि CNG अशा दोन्हीवर चालू शकते. हे ९.५ पीएस कमाल पॉवर आणि ९.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे मॉडेल ३०० किमीची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे.
फ्रीडम १२५ तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. NG04 Disc LED, NG04 Drum LED आणि NG04 Drum. एलईडी व्हेरिएंट पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत आणि नॉन-एलईडी ड्रम व्हेरिएंट दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
रिपोर्ट असे सांगतात की बजाज फ्रीडम १२५ ही २१३ किलोमीटर प्रति किलो CNG मायलेज देते. ज्यामुळे तो प्रवाशांसाठी अत्यंत कार्यक्षम पर्याय आहे.
या बाईकमध्ये सेगमेंटमधील सर्वात लांब सीट (785MM) दिली आहे; जी समोरील इंधन टाकीला खूपच जास्त प्रमाणात कव्हर करते. या सीटखाली सीएनजी टाकी ठेवण्यात आली आहे. यामध्ये हिरवा रंग CNG आणि नारंगी रंग पेट्रोल दर्शवते. असे बजाज ऑटोचे म्हणणे आहे. कंपनीचे पुढे असा दावा केला आहे की या बाईकने ११ वेगवेगळ्या चाचण्या पास केल्या आहेत; ज्यामुळे ती पूर्णपणे सुरक्षित आहे.