महाराष्ट्र सरकार-बजाज फिनसर्व्हमध्ये करार; पुण्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक, ४० हजार नोकऱ्यांची संधी

महाराष्ट्र सरकार-बजाज फिनसर्व्हमध्ये करार; पुण्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक, ४० हजार नोकऱ्यांची संधी

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) यांच्यात पुण्यात आज करार झाला आहे. या कराराच्या माध्यमातून बजाज फिनसर्व्ह पुण्यात जवळपास ५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून ४० हजार रोजगार तयार होणार आहेत. नजीकच्या काळातील महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे," अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली.

आज (दि.३) पुणे येथे माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यात पुण्यात एक करार झाला आहे. या कराराच्या माध्यमातून ही कंपनी ५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूकर करत असून त्यातून ४० हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. पुणे हळूहळू आर्थिक सेवांचे केंद्र बनत आहेत याचा आनंद आहे. आजच्या करारामुळे त्याला आणखी चालना मिळणार आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

ओडिशा अपघाताबाबत फडणवीसांनी व्यक्त केले दु:ख (Odisha Train Accident)

ओडिशामध्ये घडलेली घटना ही दु:खद आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. हा आघात सहन करण्याची शक्ती परिवारांना मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news