इंदापुरात बैलगाडा घुसला थेट नदीपात्रात

इंदापुरात बैलगाडा घुसला थेट नदीपात्रात

इंदापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहा (ता. इंदापूर ) गावात बैलगाडा शर्यतीत दोन प्रेक्षक जखमी झाले. तर एक बैलगाडा थेट भीमा नदीपात्रात गेल्याने या बैलगाडा शर्यतीला गालबोट लागले आहे. शिवाजी गंगावणे (वय 66, रा. शहा), योगेश हजारे (वय 30, रा. जेउर, ता.करमाळा,जि.सोलापूर) ही जखमी प्रेक्षकांची नावे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती आणि आमदार दत्तात्रय भरणेंच्या वाढदिवसानिमित्त रविवारी 11 जूनला आमदार केसरी बैलगाडा शर्यत झाली.

शहा गावाच्या पायथ्याला भीमा नदीकिनारी या शर्यती आयोजित केल्या होत्या. शर्यत पाहत असताना सकाळच्या सत्रात वृद्ध जखमी झाला. सायंकाळी पाठीमागून एका जणांचा धक्का लागल्याने योगेश हजारे हा युवक खाली पडला व तो बैलगाडीखाली येऊन जखमी झाला. शर्यतीला रंग येताच बैलगाडा जोरात हाकत असताना त्यापैकी एक बैलगाडा थेट भीमा नदीपात्रात घुसला. स्थानिकांच्या मदतीने तत्काळ या बैलांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. यातील जखमींवर इंदापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news