पुणे; पुढारी वृत्तसेवा : व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (दि. 12) सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून अनुक्रमे 95 हजार 380 व 59 हजार 12 अशा एकूण 1 लाख 54 हजार 392 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 5 हजार 124 जागांची वाढ झाली आहे.
दहावीनंतर अकरावी आणि तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश न घेणारे विद्यार्थी आयटीआयच्या एक आणि दोन वर्षे मुदतीच्या विविध अभ्यासक्रमांकडे वळतात. गेल्या काही वर्षांमध्ये आटीआयचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याने आयटीआय अभ्यासक्रमांना मागणी वाढली आहे. प्रवेश प्रक्रियेत राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवली जाईल.
प्रवेश प्रक्रियेसाठी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेश अर्ज शुल्क भरण्यास 12 जूनपासून सुरुवात होईल. त्यानंतर 19 जूनपासून पहिल्या फेरीसाठी शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर अर्ज निश्चित करता येईल, तसेच संस्थानिहाय विकल्प आणि प्राधान्यक्रम सादर करता येईल. विद्यार्थ्यांना अर्ज ऑनलाइन किंवा आयटीआयमध्ये ऑफलाइन पद्धतीने भरता येईल. मात्र अर्जात मोबाईल नंबर देणे अनिवार्य आहे. अधिक माहिती हीींिीं:// रवाळीीळेप. र्वींशीं. र्सेीं. ळप या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्जाची सुरवात
12 जून ते 11 जुलै
पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम
19 जून ते 12 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी
16 जुलै
पहिली प्रवेश फेरी
20 जुलै
पहिल्या यादीनुसार प्रवेश
21 ते 25 जुलै
द्वितीय प्रवेश फेरी
31 जुलै
दुसर्या यादीनुसार प्रवेश
1 ते 4 ऑगस्ट
तिसरी प्रवेश फेरी
9 ऑगस्ट
तिसर्या यादीनुसार प्रवेश
10 ते 14 ऑगस्ट
चौथी प्रवेश फेरी
20 ऑगस्ट
चौथ्या यादीनुसार प्रवेश
21 ते 24 ऑगस्ट
हेही वाचा