आमदार पवारांनी शब्द पाळला ! ग्रामपंचायत इमारतीसाठी 12 लाखांचा निधी

आमदार पवारांनी शब्द पाळला ! ग्रामपंचायत इमारतीसाठी 12 लाखांचा निधी

खेड (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  'शब्द दिला अन् तो पाळला नाही असं करतील ते रोहित पवार कसले याचा प्रत्यय आता खेडच्या नागरिकांना अनुभवास आला. त्यामुळे अनेकांची नाराजीही दूर झाली. भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या खेडने (ता.कर्जत) अद्ययावत ग्रामपंचायत इमारतीचे स्वप्न पाहिले. त्यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून 20 लाखांचा निधीही उपलब्ध झाला. या तुटपुंज्या निधीत अद्ययावत ग्रामपंचायत इमारत उभी करणे शक्य नव्हते. यामुळे सरपंच, नेते आणि काही कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवारांना भेटून निधीची मागणी केली.

जिथे अडचण येईल तिथे मला फोन करा,' असे आश्वासन आमदार पवारांनी दिला. सार्वजनिक शिवजयंती उत्सवात त्यांनी निधी देण्याचा शब्दही दिला. बघता बघता ग्रामपंचायत इमारत उभीही राहिली. मात्र, यात बराचसा कालावधीही उलटत गेला. आमदार पवारांना दिलेल्या शब्दाचा विसर पडला की, काय म्हणत अनेकांनी नाराजीचा सूर आळवला. आमदार पवारांनी स्थानिक आमदार निधीतून 12 लाखांच्या निधीची तरतूद करून सर्वांच्या प्रश्नावर उत्तर दिले. आता, हा निधी इमारतीच्या वाढीव बांधकामासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती सतीश मोरे यांनी दिली.

ग्रामस्थांतर्फे आमदार रोहित पवारांचे आभार
'आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे करणे शक्य होत आहे. स्थानिक आमदार निधीतूनही लवकरच आणखी सुशोभीकरणाची कामे मार्गी लागणार आहेत. ग्रामस्थांतर्फे ज्या मागण्या करण्यात आल्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा आमदार रोहित पवारांनी शब्द दिला आणि तो शब्द पाळलाही. त्याबद्दल समस्थ ग्रामस्थांतर्फे आमदार रोहित पवारांचे आभार मानले, असे सतीश मोरे यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news