Rahu Theft Case: राहूत चोरट्यांचा धुमाकूळ; घरांना बाहेरून कड्या लावून दहशत, मोटारसायकल चोरीने नागरिक भयभीत

सोनवणेमळ्यात मध्यरात्री चोरट्यांचा हैदोस; वाढत्या चोरीच्या घटनांमुळे यवत पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी
theft
theftPudhari
Published on
Updated on

राहू: राहू (ता. दौंड) येथील सोनवणेमळा परिसरात शुक्रवारी (दि. २५) मध्यरात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी थेट नागरिकांच्या घरांना बाहेरून कड्या लावून दहशत निर्माण केली आणि रात्री दोनच्या सुमारास एक मोटारसायकल चोरून नेली.

theft
Pune Robbery Case: एक कोटीच्या दरोडा प्रकरणात तोतया पत्रकार अटकेत; दोन पोलिस कर्मचारी सहआरोपी, पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

यासह समतानगर येथेही एका घरात चोरी केल्याची माहिती मिळत आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही मागील आठवड्यात येथील नीलकंठ ज्वेलर्स हे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला होता.

theft
Vitthalwadi Ashadhi Ekadashi: ‘प्रतिपंढरपूर’ विठ्ठलवाडीत भक्तीचा महापूर; आषाढी एकादशीला हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

राहू परिसरात अनेकदा चोऱ्या झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शेतात गेले तर बिबट्या आणि रात्री चोरट्यांच्या धुमाकुळामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. यवत पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन राहू आणि सोनवणेमळा परिसरात रात्रीची गस्त तत्काळ वाढवावी, अशी मागणी रामभाऊ सोनवणे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news