Aundh AIIMS Pune: औंध येथे एम्स उभारण्याचं अजित पवार यांचं स्वप्न अपूर्णच

ससूनवरील वाढता ताण कमी करण्यासाठी औंध एम्स प्रकल्प महत्त्वाचा ठरणार होता
Ajit Pawar
Ajit PawarPudhari
Published on
Updated on

पुणे: औंध येथे नागपूरच्या धर्तीवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानंतर त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा केला.

Ajit Pawar
Ajit Pawar Death Condolence: अजितदादा पवार यांचं जाणं महाराष्ट्रासाठी मोठी हानी : मुरलीधर मोहोळ

औंध जिल्हा रुग्णालय परिसरातील मोकळ्या जागेत ‌‘एम्स‌’च्या स्थापनेमुळे वैद्यकीय शिक्षणासह पुण्यात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी सुविधाही उपलब्ध करून देण्याचे स्वप्न दादांनी पाहिले. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी भावना आता व्यक्त होत आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar Condolence Reaction: “दादा” आपल्यात नाहीत, ही बातमी पचवणं कठीण – दिलीप वळसे पाटील

ससून सर्वोपचार रुग्णालयावर दिवसेंदिवस रुग्णसेवेचा भार वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. औंधला एम्स सुरू झाल्यावर रुग्णसेवेचा एकाच शासकीय रुग्णालयावर येणारा भारही हलका होणार आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यसेवेसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील, असे अजित पवार यांनी नमूद केले होते.

Ajit Pawar
Ajit Pawar Gurugaurav Award: ‘गुरुगौरव’ पुरस्कार देण्याची अजित पवारांची इच्छा; तीन वेळा फोन करून कार्यक्रम पुढे ढकला अशी विनंती

नागपूरमधील एम्सच्या धर्तीवर औंध जिल्हा रुग्णालय परिसरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहावे, असा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा मानस होता. त्याबाबत त्यांनी बैठकही घेतला. ते विविध विकासकामांसाठी औंध जिल्हा रुग्णालयात अनेकदा आले. पूर्ण जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधे कमी पडू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

नागनाथ यम्पल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय

Ajit Pawar
Ajit Pawar Last Meeting: जिजाऊ बंगल्यावरची भेट… आनंदी मूडमधील अजित पवारांची अखेरची आठवण

अजित पवार यांच्याशी ससून रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत फोनवर बरेचदा बोलणे व्हायचे. रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, हाच त्यांचा आग््राह होता. त्यांच्या ओळखीने कोणताही रुग्ण ससूनमध्ये आला तर त्याला नियमानुसार मदत करा, असे सांगायचे. रुग्णांसाठी फोन करायचे, काळजी घ्यायला सांगायचे.

डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news