निवृत्त नसतानाही ठेकेदारी तत्त्वावर नियुक्ती

निवृत्त नसतानाही ठेकेदारी तत्त्वावर नियुक्ती
Published on
Updated on

खडकी : पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयामधील मुख्य अभियंता सुहास संत हे येत्या 31 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. मात्र, निवृत्त होण्यापूर्वीच बोर्डाच्या बैठकीत त्यांना पुन्हा ठेकेदारी तत्त्वावर कामास घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, तो मंजूरही करण्यात आला आहे. या नियुक्तीबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. बोर्डाची बैठक गेल्या 27 जुलै रोजी झाली. या वेळी संत यांची ठेकेदारी तत्त्वावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडून तो संमतही करण्यात आला आहे. बोर्ड प्रशासनाकडे दोन सहायक अभियंता, तर तीन कनिष्ठ अभियंता सध्या कार्यरत आहेत.

मात्र, संत यांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ते निवृत्त होण्यापूर्वीच प्रशासनाने त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. यासाठी एवढी घाई का केली, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. बोर्डाची आर्थिक परिस्थिती मजबूत नसल्याने प्रशासनाने मोठ्या पगाराच्या पदांवर ठेकेदारी तत्त्वावर कर्मचारी नियुक्त करण्यात येऊ नये, असे काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रशासनाने इतर सर्व अभियंते नवीन असल्याने त्यांना कामाचा अनुभव नसल्याने ही नियुक्ती केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, संत यांनी त्यांच्या कार्यकाळात नवीन अभियंत्यांना प्रशिक्षित का केले नाही, असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बोर्ड कार्यालयात सध्या पाच अभियंते असून, सर्व अभियंते नवीन असून, त्यांची नियुक्ती मागच्या वर्षी करण्यात आली आहे. या अभियंत्यांना अनुभव नाही. नवीन अभियंत्यांना शिकविण्यासाठी अनुभवी अभियंत्यांची गरज आहे. अनुभवी असलेल्या सुहास संत यांची पुन्हा एक वर्षासाठी ठेकेदारी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे.
-रॉबिन बलेचा कार्यकारी अधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

'किरकी'चे नामकरण झाले 'खडकी'

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पूर्वीचे नाव 'किरकी कॅन्टोन्मेंट बोर्ड' असे होते. हे नाव कागदपत्री अधिकृत मानले जायचे. मात्र आता किरकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामकरण 'खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड', असे करण्यात आले आहे. याबाबत बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव संमत करण्यात आला. या बोर्डाचा कार्यालयील पत्ता या पूर्वी 'किरकी कॅन्टोन्मेंट बोर्ड' असा होता. गेल्या अनेक वर्षांपासून हे नाव प्रचलित होते. मात्र, आता या बोर्डाचे नामकरण 'खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड', असे करण्याबाबत बोर्डाचे अध्यक्ष, ब्रिगेडियर डी. जी. पटवर्धन यांनी हिरवा कंदील दिला आहे. संगमवाडी येथे बोर्डाची कर्नल बिन्नी प्रायमरी शाळा असून, या शाळेचे नावदेखील बदलण्यात आले आहे. या शाळेचे नाव कर्नल नंदा प्रायमरी स्कूल, असे करण्यात आल्याचे बोर्डाचे सीईओ रॉबिन बलेचा यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news