दहशतवादी हल्‍ला की अपघात ..! मुंबई-जयपूर एक्‍सप्रेसमधील प्रवाशांनी अनुभवला ३० मिनिटे जीवघेणा थरार

दहशतवादी हल्‍ला की अपघात ..! मुंबई-जयपूर एक्‍सप्रेसमधील प्रवाशांनी अनुभवला ३० मिनिटे जीवघेणा थरार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुंबई-जयपूर एक्‍सप्रेसमध्‍ये आज पहाटे पालघरनजीक आरपीएफ कॉन्स्टेबलने रेल्वे स्थानकाजवळ जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील चार जणांची गोळ्या झाडून हत्या केल्‍याची खळबळजनक घटना घडली. यावेळी साखर झोपेत असणार्‍या प्रवाशांमध्‍ये एकच खळबळ उडली. काही क्षण समजलंच नाही की रेल्‍वेत अपघात झाली की दहशतवादी हल्‍ला झाला. बोगी सोडून प्रवाी सैरावैरा धावू लागले. काहींनी सामान घेवून बोगी सोडण्‍याचा प्रयत्‍न केला. (Jaipur-Mumbai Express Firing in palaghar ) तब्‍बल ३० मिनिटे गोळीबार झालेल्‍या बोगीतील प्रवाशांनी जीवघेणा थरार अनुभवला….

Jaipur-Mumbai Express : प्रवासी झोपत असताना गोळीबार, प्रचंड दहशत…

माध्‍यमांशी बोलताना एका प्रवाशाने सांगितले की, पहाटे पाचच्‍या सुमारास रेल्‍वेत अचानक गोळीबार सुरु झाला. बोगी सोडून प्रवासी इकडे तिकडे धावू लागले. काहींनी आपल्‍या मुलांच्‍या सुरक्षेसाठी त्‍याांना लगेजमागे लपविण्‍याचा प्रयत्‍न केला. तर काही प्रवाशांनी सामान घेऊन पळ काढला.

रक्ताने माखलेले मृतदेह…

एका प्रवाशाने सांगितले की, गोळीबार झाला तेव्‍हा तो झोपला होता. अचानक मोठा आवाज झाला. मी प्रचंड घाबरलो. सुरुवातीला मला रेल्वे अपघात झाला असावा, असे वाटले. मात्र डोळे उघडून पाहिल्यावर समोर रक्ताने माखलेले मृतदेह पडलेले होते. मी घाबरलो आणि सीटच्या काठावर टेकून बसलो. त्याचवेळी दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, प्रवाशांना अचानक मारल्यामुळे प्रचंड दहशत पसरली. गोबीतील काही प्रवाशांना वाटलं की दहशतवादी हल्ला झाला असावा. हल्‍लेखोर अंदाधूंद गोळीबार करत बोगी सोडून दुसऱ्या डब्याकडे धावला.

मुलांसह ट्रेनमधून उडी मारली…

गोळ्यांचा आवाज प्रवाशांमध्‍ये प्रचंड दहशत पसरली. काही क्षण त्‍यांना काहीच समजले नाही. ट्रेनचा वेग कमी होताच काही प्रवाशांनी मुलांसह ट्रेनमधून बाहेर उड्या मारलया. चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याने अनेक प्रवाशांना दुखापतही झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी आपल्यावर गोळीबार करतील या भीतीने ती आपल्या मुलांना घेऊन पळून गेल्याचे महिलांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news