Pune News : पाणीपुरवठ्याच्या कामाला पुन्हा वर्षभर मुदतवाढ

Pune News : पाणीपुरवठ्याच्या कामाला पुन्हा वर्षभर मुदतवाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील नागरिकांना मुबलक व समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतरही कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे योजनेची कामे पूर्ण करण्यास चौथ्यावेळी पुन्हा एकदा एक वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे. यासंदर्भाचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून त्याला महापालिका आयुक्तांची मंजुरी घेतली जाणार आहे. महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेमध्ये असणारी 40 टक्के गळती थांबवण्यासाठी आणि समान पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने योजना हाती घेतली.

ही योजना पुढील 30 वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य 49 लाख 21 हजार 663 लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली. या योजनेसाठी अंदाजे 2 हजार 818 कोटी 46 लाख रुपये खर्च ग्रहीत धरण्यात आला असून, त्याला महापालिकेच्या मुख्य सभेने मे 2015 मध्ये मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी सल्लागाराची नेमून प्रकल्प आराखडा तयार करून 2017 मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. या योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी पाणी साठवण टाक्या, लहान मोठ्या जलवाहिन्या आणि 3 लाख 18 हजार 847 पाणी मीटर बसवणे, आदी कामे केली जाणार आहे. हे काम 36 महिन्यात पूर्ण करण्यात येणार होते. मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे दिलेल्या मुदतीमध्ये योजनेचे काम होऊ शकले नाही.

पाणी मीटर बसविण्यास विरोध
योजनेंतर्गत शहरात पाणी मिटर बसविले जात आहेत. मीटर बसविल्यानंतर पाण्याची चोरी पकडली जाणार, जास्त पाणी बिल येणार या भीतीने मिटर बसविण्यास नागरिकांकडून व राजकीय नेत्यांकडून विरोध होतो. त्यामुळे योजनेतील इतर कामांच्या तुलनेत पाणी मिटर बसविण्याचे काम अपेक्षीत उद्दिष्ठ गाठू शकलेले नाही.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news