SRA Scam: आनंदनगर एसआरए प्रकल्पात मोठा घोटाळा? एकाच जागेवर दोन वेगवेगळे प्रस्ताव सादर

पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; एका विकासकाकडून दोन एसआरए प्रकल्प दाखल केल्याचा आरोप
SRA Scam
SRA ScamPudhari
Published on
Updated on

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर येथील सर्व्हे नंबर २४२ मध्ये एकाच विकासकाने एकाच जागेवर दोन वेगवेगळे एस. आर. ए. प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प विभागाकडे सादर केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दोन भिन्न प्रकल्प दाखवून राज्य सरकारचा अधिकाधिक निधी लाटण्याचा हा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. एसआर‌ए प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहमतीनेच हे दोन बेकायदा प्रस्ताव सादर केले असल्याची चर्चा पिंपरी-चिंचवड परिसरात रंगली आहे.

SRA Scam
Coastal Security India: देशात एकात्मिक किनारी सुरक्षा कायद्याची गरज; नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी

आनंदनगर झोपडपट्टी येथील एकाच जागेवर दोन एसआरए प्रकल्प दर्शविणारा हा प्रस्ताव दि. १९ जुलै २०२२ रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव रेणुका कन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीने सादर केला आहे. या दोन्ही प्रकल्पात मिळून झोपड्यांची एकूण संख्या ही २ हजार ४५४ इतकी दाखविण्यात आली आहे.

SRA Scam
Pune Water Supply Developer Responsibility: समाविष्ट ३२ गावांतील गृहप्रकल्पांना पाणीपुरवठ्याची जबाबदारी विकासकांवरच; नवे धोरण लवकरच

पिंपरी-चिंचवड महापालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि मशाल सर्व्हेनुसार पूर्वी या प्रकल्पातील एकूण झोपड्यांची संख्या ही २ हजार २८६ इतकी आहे. मात्र, मंजूर करण्यात आलेल्या या प्रकल्पात मात्र झोपड्यांची संख्या १ हजार ८७ इतकी दाखविण्यात आली होती. यासाठी जागेचा सर्व्हे नंबर बदलण्यात आला होता. तो सर्व्हे नं २४२ असा असताना प्रत्यक्षात सर्व्हे नंबर ३११ दाखविण्यात आला होता.

SRA Scam
Land Registration Survey Policy: जमीन व्यवहारात मोठा बदल; ‘आधी मोजणी मग दस्तनोंदणी’ धोरण लागू होणार

आता पुन्हा याच जुन्या सर्व्हे नं २४२ वरील एकाच जागेवर दोन वेगवेगळे एस. आर‌‌. ए. प्रकल्प दर्शविणारा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या दोन प्रकल्पात मिळून झोपड्यांची संख्या २ हजार ४५४ इतकी दाखविण्यात आली आहे. या प्रस्तावात अनेक अनियमितता झाली असतानाही एसआरएचे तत्कालीन सीईप नीलेश गटने यांनी या प्रस्तावास मंजुरी कशी दिली? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आनंदनगर येथील कथित एसआरए घोटाळ्यात विकसक आणि एसआरएचे अधिकारी यांचेही लागेबंध असल्याचे स्पष्ट होत आहे.

SRA Scam
Balbharati English Textbook: बालभारतीच्या नव्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा नवा फॉर्म्युला

दोन वेगवेगळे प्रकल्प दाखविण्याचा हेतू काय?

दरम्यान, एकाच विकासकाने, एकाच जागेवर, तेही खासगी मालकीच्या आणि केंद्र सरकारच्या जागेवर दोन वेगवेगळे एस. आर‌. ए. प्रकल्प दाखविण्याचा हेतू काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news